• Download App
    Sri Padmanabhaswamy केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात तब्बल

    Sri Padmanabhaswamy : केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात तब्बल २७० वर्षांनंतर दुर्मिळ ‘महाभिषेकम’ होणार

    Sri Padmanabhaswamy

    जाणून घ्या, याचा मुख्य उद्देश काय आहे?


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : Sri Padmanabhaswamy केरळच्या प्राचीन पद्मनाभस्वामी मंदिरात तब्बल २७० वर्षानंतर एक दुर्मिळ महाभिषेकम होणार आहे. दीर्घकाळापासून प्रलंबित नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर हा अभिषेक केला जाईल. हा अभिषेक ८ जून रोजी होणार आहे. मंदिराच्या या विधीचा उद्देश आध्यात्मिक ऊर्जा मजबूत करणे असे सांगितले जात आहे.Sri Padmanabhaswamy

    अधिकाऱ्यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, या मंदिरातील दीर्घकाळापासून प्रलंबित नूतनीकरणाचे काम अलिकडच्या काळात पूर्ण झाले आहे. ते पूर्ण झाल्यानंतर, पुढील आठवड्यात मंदिरात महाकुंभभिषेकम (महाअभिषेक) भव्य पद्धतीने होणार आहे. मंदिरात राहणाऱ्या पुजाऱ्यांच्या मते, या विधीचा उद्देश आध्यात्मिक ऊर्जा मजबूत करणे आणि मंदिराचे पावित्र्य पुन्हा जागृत करणे आहे.



    हे विशेष प्रकारचे महानुष्ठान २७० वर्षांनंतर होणार आहे. ८ जून रोजी धार्मिक विधी होतील ज्यामध्ये तिरुवांबडी श्री कृष्ण मंदिरात नव्याने बांधलेल्या ‘थाजीकाकुडम’चा अभिषेक, विश्वसेनच्या मूर्तीची पुनर्स्थापना आणि ‘अष्टबंध कलासम’ यांचा समावेश आहे.

    पद्मनाभस्वामी मंदिर त्याच्या गूढतेसाठी ओळखले जाते. हे मंदिर सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. असे म्हटले जाते की हे मंदिर ८ व्या शतकातील आहे आणि त्रावणकोरच्या राजांनी बांधले होते.

    हे मंदिर द्रविड वास्तुकलेनुसार बांधले गेले आहे. त्याच्या गर्भगृहात भगवान विष्णूची एक मोठी मूर्ती आहे जी ‘शेषनाग’ वर आहे. पद्मनाभस्वामी मंदिरात एकूण ७ दरवाजे आहेत. त्यापैकी सातवा दरवाजा खूप धोकादायक मानला जातो. लोक म्हणतात की जेव्हा ७ वा दरवाजा उघडेल तेव्हा कलियुग संपेल. एकादशीच्या दिवशी येथे विशेष पूजा आयोजित केली जाते. हा दिवस येथे उत्सव म्हणून साजरा केली जाते.

    A rare Mahabhishekam will be held at the Sri Padmanabhaswamy temple in Kerala after 270 years

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    High Drama : TMCची रणनीती बनवणाऱ्या फर्मवर ईडीचा छापा; ममता म्हणाल्या- माझ्या पक्षाची कागदपत्रे घेऊन जात आहेत

    WHO Membership : अमेरिका 66 आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडणार; यात UNच्या 31 एजन्सींचा समावेश, 22 जानेवारीपासून अमेरिका WHOचा सदस्य राहणार नाही

    NHAI Sets : NHAIचे दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, बंगळूरु-विजयवाडा एक्सप्रेसवेवर 24 तासांत 29 किमी रस्त्याचे काम; 10,675 मेट्रिक टन डांबर अंथरले