• Download App
    भाजपबरोबर सत्तेत राहून नितीश कुमारांचा विरोधकांच्या सुरात सूर; पेगासस हेरगिरीच्या चौकशीची केली मागणी A probe should be done, indeed. We have been hearing about telephone tapping for so many days, the matter should be discussed (in Parliament).

    भाजपबरोबर सत्तेत राहून नितीश कुमारांचा विरोधकांच्या सुरात सूर; पेगासस हेरगिरीच्या चौकशीची केली मागणी

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली / पाटणा : पेगासस स्पायवेअरवरून हेरगिरी करण्याच्या विरोधी पक्षांच्या आरोपाला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बळ दिले आहे. भाजपबरोबर केंद्रात आणि बिहारमध्ये सत्तेत राहून नितीश कुमार यांनी विरोधी पक्षंच्या सुरात सूर मिसळला आहे.  A probe should be done, indeed. We have been hearing about telephone tapping for so many days, the matter should be discussed (in Parliament).

    पेगाससच्या मुद्द्यावरून काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी संसदेचे कामकाज गदारोळ करून आठवडाभर बंद पाडले. पेगासस या मुद्द्यावर विरोधकांना हवी तशी उत्तरे मोदी सरकार देत नाही. त्यामुळे विरोधकांनी संसद बंद पाडण्याचा पवित्रा घेतला आहे. अभिरूप संसद भरविण्याचा देखील विरोधकांचा मनसुबा आहे.

    या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांनी भाजप बरोबर सत्तेत राहून देखील विरोधी पक्षांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले की, गेले कित्येक दिवस आपण पेगासस हेरगिरी बद्दल ऐकतो आहोत. या विषयावर संसदेत चर्चा करायला हवी. या प्रकरणाची चौकशीही व्हायला हरकत नाही. चौकशीतून जे काही पुढे येईल ते सगळ्यांनी स्वीकारावे.

    नितीश कुमार यांनी पेगाससच्या मुद्द्यावरून विरोधकांच्या सुरात सूर मिसळणे याची ही पहिलीच वेळ नाही त्यांनी हळूहळू एनडीए विरोधात आपला आवाज मजबूत करण्याचा मनसुबा रचल्याचे दिसते. त्यांच्या पंतप्रधानपदाचे चर्चा जेडीयूने सुरु केली आहे. त्यांनी मोदी सरकारचे टीकाकार हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांचीही भेट घेतली आहे. त्यानंतर आज पेगाससच्या मुद्द्यावर नितीश कुमार यांनी विरोधी पक्षांच्या चौकशीच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. यातून ते भाजपप्रणीत एनडीए पासून दूर चाललेत काय?, असा सवाल उपस्थित होतो आहे.

    A probe should be done, indeed. We have been hearing about telephone tapping for so many days, the matter should be discussed (in Parliament).

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुंबई – पुणे मिसिंग लिंक महाराष्ट्र दिनी नागरिकांच्या सेवेसाठी खुला; घाटातल्या वाहतूक कोंडीला कायमचा आळा!!

    Swiss Air Flight : दिल्लीत टेकऑफ दरम्यान स्विस विमानाचे इंजिन फेल, आग लागली; 6 जखमी, 4 नवजात बालकांसह 232 जण होते स्वार

    PM Modi : मोदी म्हणाले- टीएमसीचा अहंकार तुटला, भाजपचा विजय निश्चित; ममता सरकारच्या राजवटीत ‘माँ-माटी, मानुष’चा सन्मान नाही