वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आज 1 एप्रिल 2023 पासून नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला LPG सिलिंडरच्या किमती कमी झाल्या आहेत. वास्तविक, पेट्रोलियम कंपन्या प्रत्येक नवीन महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी, एटीएफ, केरोसीन तेल इत्यादींच्या किमतींचा आढावा घेतात आणि त्यात बदल करतात.A pleasant shock to consumers in the new financial year, commercial LPG cylinders cheaper by Rs.92
व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत घट
पेट्रोलियम कंपन्यांनी आज नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात केली असून ही कपात व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत करण्यात आली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत आज 92 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई या सर्व शहरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली असून ते स्वस्त झाले आहेत.
असे आहेत दर
दिल्ली- 2028.00
कोलकाता- 2132.00
मुंबई- 1980.00
चेन्नई -2192.50
पूर्वीचे दर
दिल्ली – 2119.50
कोलकाता 2221.50
मुंबई 2071.50
चेन्नई 2268.00
घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल नाही
तथापि, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 1103 रुपये प्रति सिलेंडर आहे. 14.2 किलोचा घरगुती गॅस सिलिंडर गेल्या महिन्यात 50 रुपयांनी, तर 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर 350 रुपयांनी महागला होता.
जाणून घ्या LPG च्या किमती किती कमी झाल्या आहेत
आजपासून दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 91.5 ते 2028 रुपयांना उपलब्ध होतील. तर कोलकातामध्ये एलपीजी सिलिंडर 2132 रुपयांना मिळणार असून, 89.5 रुपयांनी स्वस्त आहे. दुसरीकडे, आर्थिक राजधानी मुंबईत, एलपीजी सिलिंडर 91.50 रुपयांनी स्वस्त होईल आणि 1980 रुपयांना उपलब्ध होईल, म्हणजेच त्याची किंमत 2000 रुपयांच्या खाली आली आहे. तर चेन्नईमध्ये एलपीजी सिलिंडर 75.5 रुपयांनी स्वस्त होऊन 2192.50 रुपयांना मिळेल.
A pleasant shock to consumers in the new financial year, commercial LPG cylinders cheaper by Rs.92
महत्वाच्या बातम्या
- मोदी सरकारची सर्वसामान्यांना मोठी भेट, आता अल्पबचत योजनेवर मिळणार अधिक व्याज!
- बिहार : सासारामनंतर नालंदामध्ये रामनवमीच्या मिरवणुकीत हिंसाचार; गोळीबारात तीन जण जखमी
- काळाराम मंदिरात १० फेब्रुवारीला पूजा व दक्षिणा; संयोगिता राजेंची ३० मार्चला पोस्ट; महंत सुधीरदास यांचा ३१ मार्चला खुलासा
- मोदींना पदवी सादर करण्याची गरज नाही, गुजरात हायकोर्टाचा निर्णय; केजरीवालांना 25000 चा दंड!!