- राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल आता कोरोना विरुद्ध लढाईत मैदानात उतरले आहेत.लसीचा कच्चा माल देण्यासाठी नकार देत आडमुटी धोरण अवलंब करणार्या अमेरिकेने आज यासाठी होकार देत भारतासोबत असल्याचे म्हंण्टले आहे.
- लसीचा कच्चा माल पुरवण्यासाठी होकार.
- भारताला पीपीई किट, रॅपिड टेस्टिंग कीट, ऑक्सिजन जनेरशन संदर्भात मदत.
- अमेरिकेच्या आरोग्य खात्याचं तज्ज्ञांचं पथकही येणार भारतात.
वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : भारतीय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार प्रमुख अजित डोभाल यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार प्रमुख जॅके सुलीवॉन यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर अमेरिकेने लसीसाठी लागणाऱा कच्चा माल पुरवण्यास होकार दिला आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारतातील लसीकरणाला वेग मिळणार आहे. विशेष म्हणजे याआधी अमेरिकेने सीरमच्या मागणीनंतरही कोरोना लसीच्या कच्च्या मालाबाबत निर्बंधाची भूमिका घेतली होती.A phone call from Ajit Doval And the US will support India in the fight against Corona
अमेरिकेने भारताला पीपीई किट, रॅपिड टेस्टिंग कीट, ऑक्सिजन जनेरशन संदर्भात मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. अमेरिकेच्या आरोग्य खात्याचं तज्ज्ञांचं पथकही भारतात येणार आहे. हे पथक भारतातील केंद्रीय आरोग्य मंत्रालयासोबत भारतातील कोरोना कमी करण्यासाठी संयुक्त प्रयत्न करणार आहे.
अमेरिकेची डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन आगामी काळात भारताला 2022 च्या अखेरपर्यंत 100 कोटी कोरोना डोस तयार करता येतील इतक्या कच्च्या मालाच्या उत्पादनासाठी आर्थिक सहाय्य करणार आहे.
दरम्यान, कोरोना लसींसाठी लागणारा कच्चा माल अमेरिका आणि युरोपातील काही देशांनी रोखून धरल्याने सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पुनावाला यांनी ट्विटरवर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांना टॅग करुन अमेरिकेने कच्च्या मालावरील हे निर्बंध उठवावे, अशी विनंती केली होती.