• Download App
    PUBG खेळताना महिला पडली प्रेमात अन् चार मुलांना घेऊन पाकिस्तानामधून आली थेट नोएडात! A Pakistani woman who fell in love with an Indian boy while playing PUBG came to Noida with her four children

    PUBG खेळताना महिला पडली प्रेमात अन् चार मुलांना घेऊन पाकिस्तानामधून आली थेट नोएडात!

    नेपाळमार्गे अवैधरित्या मुलासंह महिला भारतात पोहचल्याचे समोर आले आहे.

    विशेष प्रतिनिधी

    नोएडा :  प्रेमात पडलेला व्यक्ती कोणत्याही थराला जातो असं म्हणतात. असेच एक प्रकरण ग्रेटर नोएडामध्ये समोर आले आहे. PUBG खेळताना एक पाकिस्तानी महिला भारतीय तरुणाच्या प्रेमात पडली, मात्र गोष्ट इथेच थांबली नाही. तर ही महिला चार मुलांसह आपल्या प्रियकरासाठी पाकिस्तानातून थेट ग्रेटर नोएडामध्ये पोहोचली. आता पोलीस महिला आणि तरुणाची चौकशी करत आहेत. A Pakistani woman who fell in love with an Indian boy while playing PUBG came to Noida with her four children

    मिळालेल्या माहितीनुसार, रबुपुरा शहरातील रहिवासी सचिन एका किराणा दुकानात काम करायचा, त्याला PUBG खेळण्याची आवड होती. या खेळादरम्यान तो पाकिस्तानात राहणाऱ्या सीमा हैदरच्या संपर्कात आला. दोघांमध्ये गप्पा सुरू झाल्या. हळूहळू दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागले. ती महिला प्रेमात एवढी गुंतली की, ती सचिनसाठी पाकिस्तानातून आपल्या चार मुलांसह ग्रेटर नोएडाला आली.

    ही महिला आपल्या चार मुलांसह नेपाळमार्गे अवैधरित्या भारतात आली होती. ती युपीच्या ग्रेटर नोएडामध्ये तरुणासोबत राहू लागली. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी महिला व तिची चार मुलांसह संबधित तरुणास ताब्यात घेतले.

    A Pakistani woman who fell in love with an Indian boy while playing PUBG came to Noida with her four children

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    India Economy : 2047 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 5.25 पट वाढेल:अहवालात दावा- 21 वर्षांत दरडोई उत्पन्न ₹2.5 लाखांवरून वाढून ₹13.5 लाख होईल

    India Pakistan : भारत-पाकिस्तानने एकमेकांना अणु ठिकाणांची माहिती दिली; 35 वर्षांची जुनी परंपरा; ऑपरेशन सिंदूरदरम्यान किराणा हिल्सवर हल्ल्याची अफवा

    Indore : पाईपलाईनमधील गळतीमुळे दूषित पाणी; इंदूरमध्ये घातक जिवाणूमुळे 15 लोकांचा मृत्यू; मानवाधिकार आयोगाने अहवाल मागवला