• Download App
    संरक्षण क्षेत्रात विजया दशमीला नवी झेप; ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या कॉर्पोरेटायझेशनमधून 7 नव्या कंपन्या स्थापणार; 65 हजार कोटींच्या ऑर्डर्स |A new leap to Vijaya Dashami in the field of defense; 7 new companies to be set up from the corporatisation of Ordnance Factory;

    संरक्षण क्षेत्रात विजया दशमीला नवी झेप; ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या कॉर्पोरेटायझेशनमधून 7 नव्या कंपन्या स्थापणार; 65 हजार कोटींच्या ऑर्डर्स

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली – एकीकडे केंद्र सरकार सरकारी कंपन्यांमध्ये निर्गुंतणूक करीत असताना संरक्षण क्षेत्रात मात्र नवी झेप घेताना दिसत आहे. मोदी सरकारच्या आत्मनिर्भर संरक्षण धोरणानुसार देशातील ऑर्डिनन्स फॅक्टरींच्या कॉर्पोरेटायझेशनमधून 7 नव्या कंपन्या स्थापन करण्यात येणार असून त्यांना 65 हजार कोटींच्या ऑर्डर्स देखील देण्यात आल्या आहेत.A new leap to Vijaya Dashami in the field of defense; 7 new companies to be set up from the corporatisation of Ordnance Factory;

    देशात ऑर्डिनन्स फॅक्टरींचे जाळे ब्रिटिश काळापासून मजबूत आहे. पण काळाच्या ओघात या फॅक्टरींच्या आधुनिकीकरणाकडे देशाच्या तथाकथित शांतता धोरणामुळे पुरेसे लक्ष देण्यात आले नाही. संरक्षण मंत्रालयाने अधिकृत पत्रकाद्वारे हे जाहीर केले आहे.



    आता केंद्रातील मोदी सरकारने आत्मनिर्भर भारताच्या नव्या धोरणानुसार या ऑर्डिनन्स फॅक्टरींमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणून तेथे सैन्य दलांच्या नव्या गरजांनुसार सामग्री निर्माण करण्याची योजना आखली आहे. तिची अंमलबजावणी देखील सुरू केली आहे.

    या आत्मनिर्भर धोरणानुसार ऑर्डिनन्स फॅक्टरींच्या येत्या १५ ऑक्टोबरला विजया दशमीच्या मुहूर्तावर ७ नव्या कंपन्या स्थापन करण्यात येतील. त्यांना आधीच संरक्षण दलांच्या पायदळ, हवाई दल आणि नौदल या तीनही विंग्जने आधीच ६५ हजार कोटींची संरक्षण सामग्री तयार करण्याच्या ऑर्डर्स दिल्याच आहेत.

    विजया दशमीला प्रत्यक्ष या कंपन्या स्थापन करून सामग्री बनविण्याचा मुहूर्त देखील करण्यात येईल. यातून संरक्षण उत्पादने भारतात तयार होऊन ती आपल्या सैन्य दलांना उपयोगी ठरतीलच पण या कंपन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची उत्पादने तयार होऊन त्यांची निर्यात देखील करता येऊ शकेल, असे सांगण्यात येत आहे.

    A new leap to Vijaya Dashami in the field of defense; 7 new companies to be set up from the corporatisation of Ordnance Factory;

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही