विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना लसीकरणासाठी नागरिकांची होणारी धावपळ आता कमी होणार आहे. आता कोरोना लसीकरणाची वेळ व्हॉटसअॅपद्वारे बुक करता येणार आहे. तुमच्या फोनवरून अगदी सोप्या पध्दतीने लसीकरणाची वेळ निश्चित करता येणार असल्याने नागरिकांच्या सुविधेचे नवे पवर्य यामुळे सुरू होणारअसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी म्हटले आहे.A new era of facilities for citizens, now it’s time for corona vaccination on WhatsApp
शॉर्ट मेसेजींग सेवा देणाºया व्हॉटसअॅपने एमवायजीओव्ही कोरोना हेल्पडेस्कची घोषणा केली आहे. यावरून नागरिकांना आपल्या जवळील लसीकरण केंद्रातून वेळ निश्चित करता येणार आहे. मांडविय यांनी याबाबत केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की नागरिकांच्या सुविधेचे नवे पर्व सुरू करत असून आता तुमच्या फोनवर काही मिनिटांतच कोरोना लसीची अपॉर्इंटमेट घेणे शक्य होणार आहे.
पाच ऑगस्ट रोजी मायगव्ह( एमवायजीओव्ही आणि व्हॉट्सअॅपने वापरकर्त्यांसाठी चॅटबॉटमधून लस प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची सुुविधा उपलब्ध करून दिली होती. आतापर्यंत, देशभरातील वापरकर्त्यांनी 32 लाखांहून अधिक प्रमाणपत्रे डाउनलोड केली आहेत.
मार्च 2020 मध्ये व्हॉट्सअॅपवर मायगोव्ह ( एमवायजीओव्ही) कोरोना हेल्पडेस्क सुरू झाला आहे. या माध्यमातून कॊरॊनासंदर्भातील सर्वात विश्वासार्ह माहिती दिली जात आहे. चार कोटी दहा लाखांहून अधिक नागरिकांनी त्याचा वापर केला आहे.
मायगोव्हचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक सिंह म्हणाले की, मायगोव्ह कोरोना हेल्पडेस्क हा एक पथदर्शी प्रकल्प आहे. त्यामुळे देशभरातील लाखो नागरिकांना फायदा झाला आहे.व्हॉट्सअॅपचे सार्वजनिक धोरण संचालक शिवनाथ ठुकराल म्हणाले, एक डिजिटल व्यासपीठ म्हणून आम्ही कोरोना महामारीशी लढण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहोत.
असा करा कोरोना हेल्पडेस्कचा लसीकरणासाठी उपयोग मायगोव्ह कोरोना हेल्पडेस्कच्या माध्यामातून कोरोना लसीकरणाची वेळ ठरविण्यासाठी नागरिकांना प्रथम 91 9013151515 हा व्हॉट्सअॅप क्रमांक सेव्ह करावा लागेल. त्यानंतर या क्रमांकावर ‘बुक स्लॉट’ टाइप करून चॅट सुरू करा आणि वरील नंबरवर पाठवा. यामुळे संबंधित मोबाइल फोन क्रमांकावर सहा अंकी वन-टाइम पासवर्ड तयार होईल.
वापरकर्त्यांनी नंतर पिनकोड आणि लसीच्या प्रकारावर आधारित पसंतीची तारीख आणि स्थान निवडावे. सर्व वापरकर्ते त्यांच्या केंद्राची आणि त्यांच्या लसीच्या भेटीच्या दिवसाची पुष्टी मिळवण्यासाठी या अनुक्रमाचे अनुसरण करू शकतात.
A new era of facilities for citizens, now it’s time for corona vaccination on WhatsApp
महत्त्वाच्या बातम्या
- नारायण राणे यांच्या अटकेच्या प्लॅनमागचे मास्टरमाइंड अनिल परब, पोलीसांच्या सतत संपर्कात, व्हिडीओ व्हायरल
- G-7 मध्ये घेतला निर्णय ,काबूल विमानतळ 31 ऑगस्टपर्यंत रिकामे केले जाणार नाही, तालिबानला द्यावा लागणार सुरक्षित मार्ग
- तेव्हा तुमची आई देश विकत होती का? स्मृति ईराणी यांचा राहूल गांधींवर पलटवार
- चंदा कोचर यांच्यावर ईडीचे आरोपपत्र, व्हिडीओकॉन ग्रुपला नियम धाब्यावर बसवून ३०० कोटी कर्ज