• Download App
    स्वतःच्या घरात गणपती बसवणाऱ्या मुस्लिम महिलेने धर्मांधांचा फतवा धाडसाने धुडकावला!!|A Muslim woman who installs Ganpati in her own house boldly defies the fatwa of fanatics!!

    स्वतःच्या घरात गणपती बसवणाऱ्या मुस्लिम महिलेने धर्मांधांचा फतवा धाडसाने धुडकावला!!

    वृत्तसंस्था

    मेरठ : आपल्या घरात गणपती बसवणाऱ्या मुस्लिम महिलेविरुद्ध उत्तर प्रदेशातील मेरठ मध्ये धर्मांध मुस्लिमांनी फतवा काढला आहे. पण असल्या फतव्याला आपण घाबरत नसून माझे पती पण माझ्याबरोबर आहेत. माझ्या श्रद्धेनुसार मी गणेश पूजा करणारच असे या महिलेने स्पष्ट केले आहे.A Muslim woman who installs Ganpati in her own house boldly defies the fatwa of fanatics!!



    उत्तर प्रदेशातील मेरिटमध्ये रुबी असिफ खान असे या महिलेचे नाव आहे. त्या शहरात भाजपचे काम करतात. त्यांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरात गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. याआधी देखील अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या दिवशी त्या उत्सवात सहभागी झाल्या म्हणून त्यांच्याविरुद्ध धर्मांधांनी फतवा जारी केला होता. मेरठमधील मशिदीमध्ये त्यांच्या नावाची जिवंत जाळण्याची पोस्टर्स धर्मांधांनी लावली होती. आता त्यांनी गणेश प्रतिष्ठापना केल्याबद्दल त्यांना धमक्या मिळत आहेत त्यांच्याविरुद्ध फतवाही जारी केला आहे.

    पण आपण या धर्मांधांना घाबरत नसून निडरपणे सर्व गोष्टींचा सामना करू. सात दिवसानंतर घरच्या गणपतीचे मी विसर्जन करणार आहे. त्याआधी धर्मांधांना घाबरून माझ्या श्रद्धेशी मी तडजोड करणार नाही. कारण माझ्या पतीची मला साथ लाभली आहे, असे प्रत्युत्तर रुबी खान यांनी दिले आहे.

    A Muslim woman who installs Ganpati in her own house boldly defies the fatwa of fanatics!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Lok Sabha : लोकसभेत निवडणूक सुधारणांवर चर्चा, मतचोरीवर वादंग; राहुल गांधींना दुबेंचे उत्तर- पदांचे बक्षीस तर काँग्रेस देत होती

    गुजरातेत 6 वर्षांच्या चिमुरडीवर निर्भयासारखे क्रौर्य; बलात्कारात अपयशी ठरल्याने गुप्तांगात रॉड घातला, आरोपीला अटक

    India Russia : भारतीय वस्तू 40 ऐवजी 24 दिवसांत रशियात पोहोचतील; मोदी-पुतिन यांच्या करारामुळे 6000 किमीची बचत