• Download App
    सलमान खानने शिकार केलेल्या काळविटाच उभारण्यात येणार स्मारक । A memorial will be erected on the antelope hunted by Salman Khan

    सलमान खानने शिकार केलेल्या काळविटाच उभारण्यात येणार स्मारक

    दहा एकर जमिनीवर एक हजार झाडे लावली जाणार आहेत. तेथे पशुपक्षी निर्धास्तपणे फिरू शकतील. A memorial will be erected on the antelope hunted by Salman Khan


    विशेष प्रतिनिधी

    जोधपूर : जोधपूरपासून २० किलोमीटर अंतरावर कनकानी गावात १९९८ मध्ये ‘हम साथ-साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी एका काळविटाची शिकार केल्याचा सलमान खानवर आरोप होता.हा आरोप तेथील परिसरात राहणाऱ्या बिष्णोई समाजाने केला होता.त्याचा खटला अद्याप सुरू आहे.

    दरम्यान आता या काळविटाचे ज्या जागेवर काळविटाचे दफन केले होते, त्याच ठिकाणी स्मारक उभारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे त्या काळविटाच्‍या स्मरणार्थ आठ ते दहा एकर जमिनीवर वन व पशुपक्ष्यांसाठी संरक्षित क्षेत्र तयार करण्याचा निर्णय बिष्णोई समाजाने घेतला आहे.देगणी जमवून या सर्व कामाला प्रारंभ झाला आहे.



    याशिवाय दहा एकर जमिनीवर एक हजार झाडे लावली जाणार आहेत. तेथे पशुपक्षी निर्धास्तपणे फिरू शकतील. विशेष म्हणजे या स्मारकाच्या माध्यमातून निसर्गावर प्रेम करण्याचा संदेश देण्यात येणार आहे.यावेळी प्रेम सरन या बिष्णोई समाजातील युवकाने ” प्राणी आमच्या कुटुंबाप्रमाणे आहेत. आमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्यांच्या बचावासाठी आम्ही आमच्या प्राणांची बाजी लावू शकतो”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

    A memorial will be erected on the antelope hunted by Salman Khan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले