औषधं आणि इंजेक्शन महाग असल्यानं गरिबांना उपचार घेताना अडचणी येत आहेत. त्यामुळे इंजेक्शनचं उत्पादन वाढवा, त्यावरील कर कमी करा, गरिबांना मोफत उपचार द्या, औषधांचा काळाबाजार रोखा अशी पंतप्रधानांना विनवणी करत दररोज जळणाऱ्या चिता चिंतेचं कारण ठरत आहेत, असे अंत्यविधीचे सामान विकणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाने पत्र लिहून म्हटले आहे.
विशेष प्रतिनिधी
देवास : औषधं आणि इंजेक्शन महाग असल्यानं गरिबांना उपचार घेताना अडचणी येत आहेत. त्यामुळे इंजेक्शनचं उत्पादन वाढवा, त्यावरील कर कमी करा, गरिबांना मोफत उपचार द्या, औषधांचा काळाबाजार रोखा अशी पंतप्रधानांना विनवणी करत दर रोज जळणाºया चिता चिंतेचं कारण ठरत आहेत, असे अंत्यविधीचे सामान विकणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाने पत्र लिहून म्हटले आहे. A letter to the Prime Minister from a senior citizen who sells funeral goods
मध्य प्रदेशातल्या देवास जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या लीलाधर व्यास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी लीलाधार व्यास. देवासमध्ये अंत्यविधीचं सामान विकण्याचा व्यवसाय करतो. गेल्या कित्येक दिवसांपासून मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे.
आधी दिवसाला एक ते दोन जणांचा मृत्यू व्हायचा. पण आता दिवसाला सरासरी १२ ते १५ जणांचा मृत्यू होतोय. अंत्यविधीच्या सामानाच्या दुकानामुळे माझी उपजीविका चालते. मात्र मृत्यूचं वाढलेलं प्रमाण चिंताजनक आहे. मृतांमध्ये वृद्ध, तरुण, लहान मुलं अशा सर्वच वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे. मृतांच्या यादीत कदाचित माझंही नाव येईल. कोरोनामुळे मृत पावणाºयांच्या यादीत कदाचित माझे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांचे नाव येईल.
व्यास यांनी म्हटले आहे की, गेल्या वर्षीप्रमाणे देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. अनेक शहरं कोरोनाच्या विळख्यात सापडली आहेत. कोरोना रुग्णांवरील उपचारार्थ वापरली जाणाºया रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा असल्यानं त्यांची चढ्या दरानं विक्री होत असल्याचं मी ऐकलं आहे.
गरीब व्यक्ती हे महागडं इंजेक्शन कसं खरेदी करणार? हे इंजेक्शन विकत घेणं त्याच्यासाठी अतिशय अवघड आहे साहेब. माणसं मरुन पडतील तेव्हा जाग येणार का? काहींची बेफिकिरी आणि काहींची मजबुरी…ज्यांनी आपली माणसं गमावली, त्यांना आयुष्याची किंमत माहित्येय. औषधं आणि इंजेक्शन महाग असल्यानं गरिबांना उपचार घेताना अडचणी येत आहेत. त्यामुळे इंजेक्शनचं उत्पादन वाढवा, त्यावरील कर कमी करा, गरिबांना मोफत उपचार द्या, औषधांचा काळाबाजार रोखा, असे सल्ले व्यास यांनी सरकारला दिले आहेत. मृतांची संख्या वाढत आहे.
मृत्यूचं प्रमाण किती वाढलंय याची कल्पना स्मशानात दररोज येणारे मृतदेह पाहून येऊ शकेल. ज्यांनी आपली जवळची माणसं गमावली आहेत, त्यांना आयुष्याची किंमत माहीत आह. याआधी कधीच इतके मृत्यू पाहिले नाहीत. मी अंत्यविधीचं सामान विकतो. माझं एक दुकान आहे. मात्र आयुष्यात कधीच इतकी भयावह परिस्थिती पाहिली नाही. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ही संख्या स्मशानात गेल्यावरच कमी होत आहे.
A letter to the Prime Minister from a senior citizen who sells funeral goods
वाचा…
- मध्यप्रदेशामध्ये लॉकडाऊन लावणार नाही ; मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे सूतोवाच
- पेट्रोल, डिझेलवर सर्वाधिक कर लादणाऱ्या राजस्थान सरकारविरोधात पेट्रोल पंप चालकांचे आंदोलन, एक दिवस राज्यातील सर्व पेट्रोलपंप बंद
- ऑक्सिजन पुरवठावाढ, रेमडेसिवीरचा जपून वापर आणि अनेक ठिकाणी विद्युत शवदाहिन्या उभारण्यावर भर; कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत चर्चा
- कोविड फक्त महाराष्ट्रातच का वाढतोय, निवडणूकांच्या राज्यात का नाही वाढत?; काँग्रेसचे मंत्री अस्लम शेरखान यांचा सवाल
- घरफोडीच्या गुन्ह्यात 28 वर्षांपासून फरारी आरोपीला पुण्यात बेड्या