दिल्लीच्या राज्यपालांकडून NIA तपासाची शिफारस!!
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला खलिस्तानवादी संघटना “सिख फॉर जस्टीस” हिने तब्बल 16 दशलक्ष डॉलरची देणगी दिल्याची गंभीर तक्रार झाली आणि दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी केजरीवाल यांची राष्ट्रीय तपास संस्थेकडून अर्थात NIA तपास करण्याची शिफारस केलीA Khalistanist separatist organization’s $16 million donation to the Aam Aadmi Party; Kejriwal will get caught in NIA’s net!!
नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी केंद्रीय गृह सचिवांना या संदर्भात सविस्तर पत्र लिहून त्यांच्याकडे आलेल्या तक्रारी संदर्भातले सर्व तपशील या पत्राला जोडले आणि त्याबरहुकूम राष्ट्रीय तपास संस्थेने अर्थात NIA ने अरविंद केजरीवालांची चौकशी आणि तपास करावा, अशी शिफारस केली.
खलिस्तानी समर्थक म्होरक्या देवेंद्र पाल भुल्लर याच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देऊन अरविंद केजरीवालांनी 14 मध्ये न्यूयॉर्क मधल्या रिचमंड हिल गुरुद्वाराला भेट दिली. तिथे त्यांनी खलिस्तानवादी नेत्यांशी बंद दाराआड चर्चा केली. त्यानंतर 2014 ते 2022 या 9 वर्षांच्या कालावधीत तब्बल 16 दशलक्ष डॉलरची देणगी स्वीकारली, असा आरोप तक्रारदार वर्ल्ड हिंदू फेडरेशन यांनी केली. या आरोपाची प्राथमिक शहानिशा केल्यानंतर नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी केजरीवाल यांच्या त्यावेळच्या सर्व हालचालींची राष्ट्रीय तपास संस्थेकडून अर्थात
NIA चौकशी आणि तपासाची शिफारस केली.
केंद्रीय गृह सचिवांना लिहिलेल्या पत्राबरोबर सक्सेना यांनी त्यांच्याकडे उपलब्ध झालेले सगळे पुरावे जोडले आहेत. यामध्ये रिचमंड हिल गुरुद्वारा मधले केजरीवाल आणि फुटीरतावादी म्होरके यांचे काही एकत्र फोटो तसेच अन्य काही कागदपत्रे आहेत.