विशेष प्रतिनिधी
जम्मू : श्रीनगरमधील अमीराकडल मध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर ग्रेनेड फेकले. ग्रेनेडच्या स्फोटात एका पोलीस कर्मचाऱ्यासह 20 जण जखमी झाले. याशिवाय गंभीर जखमी झालेल्या एका नागरिकाचाही मृत्यू झाला. अचानक झालेल्या स्फोटानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला .A grenade blast in Srinagar has injured 20 people, including a policeman
माहिती मिळताच पोहोचलेल्या इतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. दहशतवाद्यांचा शोध मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. सर्व जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
अमीरकडल येथील ब्लॉकवर सुरक्षा दलांची तुकडी तैनात होती. दरम्यान त्यांच्यावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला. लक्ष्य चुकवल्याने ग्रेनेड दुसऱ्या ठिकाणी जाऊन स्फोट झाला. आयजी विजय कुमार म्हणाले की, दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.
श्रीनगरमधील आलमगिरी मार्केटमध्ये संशयास्पद वस्तू
श्रीनगर शहरातील आलमगिरी मार्केटमध्ये रस्त्याच्या कडेला एक संशयास्पद वस्तू आढळल्याने शनिवारी घबराट पसरली. माहिती मिळताच पोलीस आणि सीआरपीएफचे अधिकारी आणि जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिसरातील वाहतूक थांबवली.
सुरक्षा दलांनी बॉम्ब नाशक पथकाला घटनास्थळी पाचारण केले, त्यांनी संशयास्पद वस्तू सुरक्षित ठिकाणी नेत नष्ट केली. त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. मात्र, तपासादरम्यान रस्त्याने जात असताना दुचाकीस्वाराची बाटली पडल्याचे आढळून आले.
श्रीनगरचे पोलीस अधीक्षक राकेश बलवाल यांनी सांगितले की, तपासादरम्यान एका दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज स्कॅन करण्यात आले असून ही बाटली एका वृद्ध व्यक्तीच्या सायकलवरून पडल्याचे आढळून आले आहे.
A grenade blast in Srinagar has injured 20 people, including a policeman
महत्त्वाच्या बातम्या
- Ukraine Indian Students : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी “गुगल फॉर्म”
- महिला विश्वचषक सामन्यात भारताकडून पाकिस्तानचा पराभव
- PM Modi Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुणे दौर्यातला भर राजकारणावर नव्हे; विद्यार्थ्यांशी संवादावरच का ठेवला…??
- PM Modi Symbiosis : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिंबायोसिसच्या विद्यार्थ्यांना दिला देशाच्या विकासाच्या थीमवर काम करण्याचा मंत्र!!