मराठी मातीतला ‘रानकवी’ हरपला
प्रतिनिधी
पुणे : मातीत रमणारा, निसर्गाची अनेक रुपे आपल्या शब्दांतून उलगडून दाखवणारा संवेदनशील रानकवी हरपला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ साहित्यिक, कवी माजी आमदार ना. धो. महानोर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. महानोर यांच्या निधनामुळे मराठी साहित्य क्षेत्राची हानी झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे. A great Marathi poet Nd Mahanor Tribute
‘मराठी माती सर्जनशीलतेची खाण आहे. यात ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर यांनी आपल्या शब्द सामर्थ्याने निसर्गाची, राना- वनातील, पानाफुलांतील सौंदर्य अनेकविध रूपे रसिकांसमोर मांडली. ते प्रयोगशील शेतकरी होते. शेतकऱ्यांच्या सुखदुःखाची मांडणी करताना त्यांनी ग्रामीण जीवनाच्या अनेक पैलूंवर आपल्या लेखनातून प्रकाश टाकला.
शेतातून, साहित्यिक मंच ते विधानपरिषद असा त्यांचा प्रवास राहिला. या सगळ्याच ठिकाणी महानोर यांनी आपल्या संवेदनशील कवी मनाची अमीट छाप उमटवली आहे. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांची उणीव निश्चितच भासत राहील. ज्येष्ठ साहित्यिक, कवी माजी आमदार ना. धो.महानोर यांना भावपूर्ण श्रद्धांजली,’ असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
A great Marathi poet ND Mahanor Tribute
महत्वाच्या बातम्या
- पॉक्सो प्रकरणात बृजभूषण यांना दिलासा; अल्पवयीन कुस्तीपटूला दिल्ली पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टवर हरकत नाही
- देशातील 4001 आमदारांकडे 54,545 कोटी रुपयांची संपत्ती, ईशान्येतील 3 राज्यांच्या बजेटपेक्षाही जास्त
- हरियाणा हिंसाचाराची धग राजस्थानपर्यंत पोहोचली; उत्तर प्रदेशातही अलर्ट जारी, 5 ठार
- विरोधकांच्या’I.N.D.I.A’ची आज पहिली अग्निपरीक्षा; दिल्ली सेवा विधेयकावर लोकसभेत चर्चा होणार