• Download App
    A fire broke out in an Indonesian prison; At least 40 prisoners killed; Relief work begins quickly

    इंडोनेशियाच्या तुरुंगात आगीचा भडका उडाला; किमान ४० कैद्यांचा मृत्यू; मदतकार्य वेगात सुरु

    वृत्तसंस्था

    बाली : इंडोनेशियाच्या बॅन्टेन येथील तुरुंगात आग लागून ४० कैद्यांचा मृत्यू झाला. कायदा आणि मानवाधिकार मंत्रालयाच्या कारागृह विभागाच्या प्रवक्त्या रिका अपारिंती यांनी या घटनेची माहिती दिली आहे. मध्यरात्री १ ते २ च्या दरम्यान ही आग लागली. मदतकार्य वेगाने सुरु असून अधिकारी कैद्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. A fire broke out in an Indonesian prison; At least 40 prisoners killed; Relief work begins quickly

    रॉयटर्सनुसार, तुरुंगात क्षमतेपेक्षा जास्त कैदी होते. मध्यरात्री १ किंवा २ च्या सुमारास आग लागली. तेव्हा कैदी झोपले होते. आगीत कैदी गंभीर भाजले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.



    टेंगरंग कारागृहाचा ताबा घेण्यासाठी शेकडो पोलिस आणि सैनिक तैनात केले आहेत. तुरुंगात १,२२५ कैद्यांची क्षमता असताना २००० पेक्षा जास्त कैदी ठेवले आहेत. काही तासांनंतर आग विझवली गेली आहे आणि सर्व पीडितांना रुग्णालयात हलवले आहे.

    इंडोनेशियात तुरुंगातून पळून जाण्याची आणि दंगली होण्याचा घटना नेहमी घडतात. या तुरुंगात मोठ्या संख्येने बेकायदा ड्रग्जच्या विरोधात अटक झालेल्या कैद्याना ठेवलेले आहे.

    A fire broke out in an Indonesian prison; At least 40 prisoners killed; Relief work begins quickly

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार