येथे एका निवासी इमारतीला लागलेल्या आगीत 9 मुलांसह 19 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून तेथे मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अलीकडच्या काही दिवसांत न्यूयॉर्कमधील निवासी भागात अशा प्रकारची आग लागण्याची ही पहिलीच घटना आहे. A fire broke out in a multi-storey building in New York, killing 19 people, including 9 children, read more
वृत्तसंस्था
न्यूयॉर्क : येथे एका निवासी इमारतीला लागलेल्या आगीत 9 मुलांसह 19 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून तेथे मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अलीकडच्या काही दिवसांत न्यूयॉर्कमधील निवासी भागात अशा प्रकारची आग लागण्याची ही पहिलीच घटना आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागली तेव्हा बहुमजली इमारतीच्या खिडकीतून लोक मदतीसाठी आरडाओरड करत होते, मात्र आग इतकी भीषण होती की काहींना योग्य वेळी मदत मिळाली नाही. आगीच्या कारणाबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, इमारतीला आग लागल्याची घटना पोर्टेबल इलेक्ट्रिक हिटरमुळे झाली आहे.
त्याच वेळी, या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, महापौर एरिक अॅडम्स यांनी पत्रकारांना सांगितले की, 19 लोकांचा मृत्यू झाल्याचे कळले आहे आणि 63 जण भाजले आहेत, ज्यापैकी अनेकांची प्रकृती अत्यंत ‘नाजूक’ आहे. ते म्हणाले की, त्यांच्या आयुष्यातील आणि न्यूयॉर्कच्या इतिहासातील आगीची ही सर्वात भयानक घटना आहे. त्यांच्या कार्यालयाने या दु:खद घटनेबद्दल खेद व्यक्त करत ट्विट केले आणि लिहिले की, आपण गमावलेल्या लोकांसाठी, विशेषत: या दुर्घटनेत अकाली मृत्यू आलेल्या 9 मुलांसाठी तुम्ही माझ्यासोबत प्रार्थनेत सामील व्हा.
ही आग अमेरिकेच्या वेळेनुसार सकाळी 11 वाजता ब्रॉन्क्समधील 19 मजली इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर लागली. याबाबत माहिती देताना न्यूयॉर्क अग्निशमन विभागाने एका वृत्तसंस्थेला सांगितले की, माहिती मिळताच विभागाने योग्य आपत्कालीन प्रोटोकॉलचे पालन करून मदत आणि बचाव कार्य सुरू केले. त्याच वेळी, आग लागल्यावर अग्निशमन विभागाने आपल्या 200 अग्निशमन जवानांना मदत आणि बचाव कार्यासाठी गुंतवले आहे.