विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : येथे हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीला मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. कामगार झोपेत असताना कंपनीला आग लागली. वाळूज औद्योगिक परिसरातील हँडग्लोज बनवणाऱ्या सनशाईन एंटरप्राईज कंपनीत ही दुर्घटना घडली. या घटनेत 6 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 4 कामगारांनी कसाबसा स्वतःचा जीव वाचवला.A fire breaks out at a company manufacturing gloves in Chhatrapati Sambhajinagar, 6 people die, an incident in Walaj
कामगार झोपेत असताना अचानक आग
वाळूज औद्योगिक परिसरात सनशाईन एंटरप्राईज सी 216 या हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीमध्ये सुमारे 20 ते 25 कामगार काम करतात. 10 कामगार कंपनीमध्ये राहतात. सगळे झोपेत असताना अचानक आग लागली. काही झोपलेल्या कामगारांना गरम वाफ लागल्याने जाग आली, तेव्हा त्यांना आग लागल्याचे लक्षात आले. यानंतर जीव वाचण्यासाठी कामगारांची पळापळ सुरू झाली.
सहा कामगारांचा होरपळून मृत्यू
कंपनीतून बाहेर पडण्याच्या ठिकाणी आग लागल्याने आतमध्ये असलेल्या कामगारांना बाहेर पडणे कठीण होते, पण काही कामगारांनी पत्र्यावरून एका झाडाच्या साहाय्याने स्वतःची सुटका केली. भल्ला शेख, कौसर शेख, इक्बाल शेख, मगरुफ शेख आणि इतर अशा सहा कामगारांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला.
आगीतून सुखरूप बचावलेला कामगाराने सांगितले की, ”काम बंद करून आम्ही मध्यरात्री आम्ही झोपलो असता, आम्हाला उष्णता जाणवल्याने जाग आली. आजूबाजूला पाहिले तर सगळीकडे आग पसरली होती. आम्ही आरडाओरड करत इतरांना जागे करण्याचा प्रयत्न केला. कंपनीतून बाहेर पडण्याच्या दरवाजाच्या बाजूने आग लागल्याने आगीतून बाहेर पडणे कठीण झाले होते. त्यानंतर दरवाजाच्या बाजूने आग लागल्यामुळे कामगारांनी वरती चढून पत्र्यावरून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. चार जण सुखरूप बाहेर पडले.”
4 तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात
या घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि आग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. या आगीवर तब्बल 4 तासांच्या प्रयत्नानंतर नियंत्रण मिळवता आले. सर्व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात आणण्यात आले असून, पुढील तपास एमआयडीसी वाळूज पोलिसांनी सुरू केला आहे.
A fire breaks out at a company manufacturing gloves in Chhatrapati Sambhajinagar, 6 people die, an incident in Walaj
महत्वाच्या बातम्या
- पाकिस्तान निवडणूक आयोगाकडून इम्रान खान यांना मोठा धक्का, उमेदवारी रद्द
- विनेश फोगटने खेलरत्न-अर्जुन पुरस्कार परत केले; बजरंग पुनिया म्हणाला- महिला कुस्तीपटूंसाठी सर्वात वाईट काळ
- महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ठाकरेंचा पलड़ा पवारांवर भारी; पवारांच्या “राष्ट्रीय” राजकारणाची ही तर खरी “बारामती श्री”!!
- रशियाच्या बॉम्बहल्ल्यांनी युक्रेन हादरले, 122 क्षेपणास्त्रे, 36 ड्रोनने हल्ला; 24 जणांचा मृत्यू