कोरोनापासून बचावासाठी मास्कचा वापर करा असे आवाहन पंतप्रधानांपासून ते रस्त्यावर उभ्या पोलीस कर्मचाऱ्यापर्यंत संपूर्ण शासकीय यंत्रणा करत आहे. तरीही काही महाभाग विनामास्क फिरत आहेत. अशाच एका महाभागाला मास्क नसल्यामुळे तब्बल दहा हजार रुपये दंड भरावा लागला. उत्तर प्रदेश पोलीसांनी हा दहा हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.A fine of Rs 10,000 for traveling without a mask, the first in the country in Uttar Pradesh
विशेष प्रतिनिधी
देवरिया: कोरोनापासून बचावासाठी मास्कचा वापर करा असे आवाहन पंतप्रधानांपासून ते रस्त्यावर उभ्या पोलीस कर्मचाऱ्यापर्यंत संपूर्ण शासकीय यंत्रणा करत आहे.
तरीही काही महाभाग विनामास्क फिरत आहेत. अशाच एका महाभागाला मास्क नसल्यामुळे तब्बल दहा हजार रुपये दंड भरावा लागला. उत्तर प्रदेश पोलीसांनी हा दहा हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
देवरिया पोलीसांनी अमरजीत यादव नावाच्या व्यक्तीकडून दहा हजार रुपये दंड वसूल केला आहे. संपूर्ण देशातच मास्क लावण्याचे बंधन आहे. त्यासाठी प्रत्येक शहरात वेगवेगळे दंडही आहेत. दुसऱ्यांदा गुन्हा असल्यास दंडाची रक्कक जास्त आहे
देवरियाचे पोलीस अधीक्षक श्रपति मिश्र यांनी दिलेल्या माहितीनुसार अमरजीत याला दोन दिवसांपूर्वी पोलीसांनी विनामास्क पकडले होते. त्यावेळी त्याला एक हजार रुपये दंड करण्यात आला होता.
त्यावेळी पोलीसांनी त्याला एक मास्कही दिला होता. मात्र, तरीही अमरजीतला अक्कल आली नाही. पुन्हा विनामास्क फिरू लागला. यावेळी पकडल्यावर मात्र त्याला दहा हजार रुपयांचा दंड करण्यात आला.
उत्तर प्रदेश सरकारने कोरोनाला रोखण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. मास्क न घातलेला पहिल्यांदा पकडला गेला तर हजार रुपये आणि दुसऱ्यांदा पकडला गेला तर दहा हजार रुपये दंड आहे. अमरजीत हा मास्क न घालण्यासाठी दहा हजार रुपये भरावा लागलेला पहिला बनला आहे.