• Download App
    हिंदू-मुस्लीम ऐक्य बिघडवण्याच्या उद्देशाने समाजकंटकांडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाखाली सोशल मीडियावर बनावट पत्रक व्हायरल!A fake leaflet viral on social media in the name of Rashtriya Swayamsevak Sangh

    हिंदू-मुस्लीम ऐक्य बिघडवण्याच्या उद्देशाने समाजकंटकांडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाखाली सोशल मीडियावर बनावट पत्रक व्हायरल!

    संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील अंबेकर यांनी दिली माहिती

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बदनामी करण्यासाठी तसेच समाजातील शांतता बिघडवण्यासाठी, हिंदू-मुस्लीम वाद निर्माण होण्यासाठी काही समाजकंटकांकडून सध्या सोशल मीडियावर एक पत्रक व्हायरल करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हे पत्रक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाखाली प्रसारित करण्यात आलं आहे. एवढंच नाहीतर सरसंघचालक यांचं अतिगोपनीय कथन असं सांगून अधिक प्रसारित केलं जावं, अस ही यामध्ये सुरुवातीलच नमूद करण्या आलं आहे. तर हे पत्रक पूर्णपणे खोटे असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. A fake leaflet viral on social media in the name of Rashtriya Swayamsevak Sangh


    ब्रिटिश राजदूताने ‘शोले’ ऐवजी लिहिले ‘छोले’ अन् यूजर्स साधली संधी, अखेर…


    “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाने सोशल मीडियावर फिरणारे हे पत्रक पूर्णपणे खोटे आहे.’’ असं ट्वीट करत संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील अंबेकर यांनी ते खोटे पत्रक ट्वीट केलं आहे.

    पत्रकात नेमकं काय आहे? –

    बनावट पत्रकात ‘’जसं की तुम्ही सर्वजण जाणता, आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी दरवर्षी दहा लाख मुस्लीम तरुणींना परत आणण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे. ज्या अंतर्गत सर्व हिंदू मुलं जास्तीत जास्त इस्लाममधून धर्मांतरण करून हिंदू धर्मात आणण्यासाठी काम करतील. ज्यासाठी तुम्हा सर्वांना १५ दिवसांचं प्रशिक्षिण दिलं जाईल. ज्यामध्ये तुम्हाला सांगितलं जाईल, की मुस्लीम मुलींना त्यांच्या धर्मातून कसं सोडवलं जाईल आणि हिंदू धर्मात घरवापसी कशी करता येईल?’’ असं सुरूवातीस म्हटलं आहे.

    याशिवाय ‘’आपला उद्देश केवळ मुस्लीम मुलींना हिंदू धर्मात आणणे आहे. कारण, एक मुलगी येणाऱ्या पिढीला हिंदू बनवू शकते. एक मुस्लीम मुलगी मुस्लीम मुलांना जन्म देते, आणि ती जेव्हा हिंदू धर्मात परिवर्तित होते तर तिने जन्म दिलेलं प्रत्येक मूल हे हिंदू असेल. खाली काही मुद्दे दिले आहेत, ज्याद्वारे तुम्ही एखाद्या मुस्लीम मुलीस इस्लाम सोडण्यास मजबूर करू शकतात.’’असंही पत्रकात नमूद असून खाली काही मुद्दे देण्यात आले आहेत.

    A fake leaflet viral on social media in the name of Rashtriya Swayamsevak Sangh

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही