स्वत: डॉक्टर बनू नका असा सल्ला देत केंद्र सरकारने लहान मुलांवरील कोरोना उपचारासाठी नवीन गाईडलाइन्स जारी केल्या आहेत. यात वयस्क माणसांच्या उपचारासाठी वापरण्यात येणारी औषधं लहान मुलांवर वापरू नये असे म्हटले आहे.a doctor yourself, do not use Corona drugs for adults for children, guidelines issued by the central government
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : स्वत: डॉक्टर बनू नका, एक चूकही महागात पडेल असा सल्ला देत केंद्र सरकारने लहान मुलांवरील कोरोना उपचारासाठी नवीन गाईडलाइन्स जारी केल्या आहेत. यात वयस्क माणसांच्या उपचारासाठी वापरण्यात येणारी औषधं लहान मुलांवर वापरू नये असे म्हटले आहे.
सरकारने बुधवारी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेत वयस्क रुग्णांसाठी वापरण्यात येणाºया आयवरमेक्टिन, हायड्राक्सीलोरोक्वीन, फेविपिरावीरसारख्या औषधे आणि नॊक्सीसायक्विन, एजिथ्रोमायसिनसारख्या औषधांचा वापर उपचारात न करण्याचा सल्ला दिला आहे.स्वत: डॉक्टर बनू नका, एक चूक महागात पडेल अशा शब्दामध्ये केंद्र सरकारने सल्ला दिला आहे.
केंद्राच्या नव्या नियमावलीत म्हटले आहे की, लहान मुलांमध्ये काही लक्षण दिल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मुलांना कोणतंही औषधं देऊ नका, हे धोकादायक आणि जीवघेणे ठरू शकते. सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झालेल्या मेसेज पाहून काही जण घरीच प्रयोग करतात.
लहान मुलांच्या आरोग्यासाठी सध्या अस्तित्वात असणाऱ्या कोविड सेंटरची संख्या आणखी वाढवायला हवी. या केंद्रात लहान मुलांशी निगडीत वैद्यकीय उपकरणं आणि औषधं यांची गरज भासणार आहे. त्यासाठी राज्यांनी तयारी करून ठेवायला हवी.
a doctor yourself, do not use Corona drugs for adults for children, guidelines issued by the central government
महत्त्वाच्या बातम्या
- रेल्वेकडून कोरोना सेन्सेटिव्ह कोचची निर्मिती, हवेतच व्हायरसचा खात्मा करणार प्लाझ्मा एअर थेरपी
- कोरोना महामारीतील मृत्यूंमुळे भारतीय तरुण झाले सजग, जीवन विम्याच्या मागणीत वाढ
- Deep Ocean Mission : केंद्रीय मंत्रिमंडळाकडून समुद्र ‘मंथना’ला मंजुरी, डीएपीवर सबसिडी 700 रुपयांनी वाढवली
- Vivatech Summit : पीएम मोदी म्हणाले- भारतात स्टार्टअपसाठी चांगले वातावरण, गुंतवणूकदारांना ऑफर
- गाझियाबाद प्रकरण : एसएसपी म्हणाले- घटनेत धार्मिक अँगल नाही, इतर आरोपींचा शोध सुरू