• Download App
    हिरे व्यावसायिकाने तब्बल ९९९९ हिऱ्यांनी बनवली राम मंदिराची प्रतिकृती|A diamond businessman made a replica of Ram temple with as many as 9999 diamonds

    हिरे व्यावसायिकाने तब्बल ९९९९ हिऱ्यांनी बनवली राम मंदिराची प्रतिकृती

    अनोख्या पद्धतीने केली रामल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी


    विशेष प्रतिनिधी

    सुरत : 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आणि रामललाच्या प्राणप्रतिष्ठा संदर्भात संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. प्रत्येक देशवासीय वाट पाहत आहे की रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होऊन, प्रभूराम कधी त्यांच्या मंदिरात विराजमान होतील.A diamond businessman made a replica of Ram temple with as many as 9999 diamonds

    देशभरातील लोक आपल्या परीने रामल्लासाठी काहीतरी योगदान देण्याचा प्रयत्न करत आहेत. आता गुजरातमधील सुरत येथील एका व्यावसायिकाने हिऱ्यांचा वापर करून अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती तयार केली आहे. सुरतच्या कलाकाराने राम मंदिराची कलाकृती तयार करण्यासाठी तब्बल ९,९९९ हिऱ्यांचा वापर केला आहे.



    उल्लेखनीय आहे की याआधीही अशी अनेक वेगळी उदाहरणं लोक पुढे आली आहेत, ज्यांनी आपल्या कलेतून प्रभू रामाप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली होती. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड धारक शिल्पकार नवरत्न प्रजापती यांनी पेन्सिलच्या टोकावर भगवान रामाची कलाकृती तयार केली आहे.

    राजस्थानमध्ये अजय रावत या वाळू कलाकाराने राम मंदिराची कलाकृती तयार केली आहे. अजय रावत यांनी दररोज दोन ते चार तास काम केले आणि राम मंदिराची ही कलाकृती बनवण्यासाठी 1000 टनांहून अधिक वाळू वापरली गेली.

    A diamond businessman made a replica of Ram temple with as many as 9999 diamonds

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक