• Download App
    अमित शहांच्या दौऱ्याच्या एक दिवस आधी सासाराममध्ये हिंसाचार, नालंदामध्येही गोळीबार, कलम 144 लागू|A day before Amit Shah's visit, violence in Sasaram, firing in Nalanda too, Article 144 imposed

    अमित शहांच्या दौऱ्याच्या एक दिवस आधी सासाराममध्ये हिंसाचार, नालंदामध्येही गोळीबार, कलम 144 लागू

    वृत्तसंस्था

    पाटणा : केंद्रीय मंत्री अमित शहा 2 एप्रिलला बिहारमधील सासारामला भेट देणार आहेत, मात्र त्यापूर्वीच तेथे हिंसाचार उसळला. रामनवमीच्या दिवशी येथील रोहतास आणि नालंदा जिल्ह्याचे मुख्यालय सासाराम आणि बिहार शरीफमध्ये तणाव पसरला होता. यानंतर शुक्रवारी दोन्ही शहरात संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले.A day before Amit Shah’s visit, violence in Sasaram, firing in Nalanda too, Article 144 imposed

    शहा यांच्या कार्यक्रमानिमित्त शहरात तळ ठोकून असलेले भाजपचे स्थानिक खासदार छेदी पासवान म्हणाले, “परिस्थिती नियंत्रणात आल्याने आम्हाला दिलासा मिळाला आहे.” मात्र, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची वाट न पाहता प्रशासनाने अधिक सतर्क राहून कृतीशील कारवाई करायला हवी होती.



    मिरवणुकीत वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न

    नालंदा जिल्ह्यातील बिहारशरीफ येथे शुक्रवारी संध्याकाळी दोन गटांमध्ये हिंसक चकमक झाली. यावेळी मोठ्या प्रमाणात दगडफेक, जाळपोळ आणि गोळीबार झाला. या गोळीबारात पाच जण जखमी झाले आहेत. दुसरीकडे, सासाराम उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) मनोज कुमार यांनी पुन्हा संघर्ष होण्याची शक्यता असल्याने कलम-144 लागू केले आहे. एसडीएम म्हणाले, “मिरवणुकीदरम्यान, शाह जलाल पीर, सोना पट्टी, कादिर गंज आणि नवरत्न पीर सारख्या भागात संतप्त जमावाने अनेक दुकाने आणि वाहने जाळली आणि दगडफेक केली, ज्यात दोन पोलिस कर्मचार्‍यांसह अनेक लोक जखमी झाले.” या घटनेनंतर संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

    उपमहानिरीक्षक नवीन चंद्र झा, जिल्हा दंडाधिकारी धर्मेंद्र कुमार आणि पोलिस अधीक्षक विनीत कुमार लोकांना शांततेचे आवाहन करत आहेत.

    नालंदा हा मुख्यमंत्री नितीश यांचा गृह जिल्हा

    मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा गृह जिल्हा असलेल्या नालंदा येथील बिहार शरीफमधील गगन दिवाण, मन्सूर नगर आणि नबी नगरमध्ये झालेल्या संघर्षानंतर कलम-144 लागू करण्यात आली आहे. येथील संघर्षात 10 हून अधिक लोक जखमी झाले आहेत, अनेक दुकाने आणि वाहने जाळण्यात आली आहेत.

    अफवा पसरवणाऱ्यांवर लक्ष ठेवा

    नालंदाचे जिल्हा दंडाधिकारी शशांक शुभंकर म्हणाले, “आम्ही लोकांना संयम बाळगण्याचे आवाहन करत आहोत. हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजदेखील स्कॅन करत आहोत. दरम्यान, राज्य पोलीस मुख्यालयाने जमावाने गोळीबार केल्याच्या वृत्ताचे खंडन केले. सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवरही लक्ष ठेवून असल्याचे पोलिसांनी सांगितले.

    A day before Amit Shah’s visit, violence in Sasaram, firing in Nalanda too, Article 144 imposed

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!