• Download App
    धामणीखोऱ्यातील हरपवडे येथे गाळात अडकलेल्या गव्याला मिळाले जीवनदान|A cow stuck in the mud at Harapwade in Dhamanikhora got life donation

    धामणीखोऱ्यातील हरपवडे येथे गाळात अडकलेल्या गव्याला मिळाले जीवनदान

    पावसामुळे झालेल्या गाळात जेसीबी चालू शकली नाही.दरम्यान ग्रामस्थांच्या मदतीने या गव्यास रस्सी ओढून बाहेर काढण्यात यश आले.A cow stuck in the mud at Harapwade in Dhamanikhora got life donation


    विशेष प्रतिनिधी

    पन्हाळा : धामणीखोऱ्यातील हरपवडे (ता.पन्हाळा)येथे यावर्षी झालेल्या अतिवृष्टीत डोंगर खचून गुरवाचा नाळवा नावाचे शेत गाळाने गाढले आहे. दरम्यान याच शेतात शनिवारी पहाटे मादी गवा रेडी अन्नाच्या शोधात असताना गाळात अडकली असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले.दरम्यान ग्रामस्थांनी तातडीने याबाबतची माहिती वन विभागाला दिली.

    ही माहिती मिळताच बाजार भोगाव वन परीक्षेत्र पणुत्रे बीटचे वनपाल नाथा पाटील पथकासह घटनास्थळी पोहचले.या गवा मादीस गाळातून बाहेर काढण्यासाठी जेसीबी मशीनद्वारे प्रयत्न करण्यात आला. पण पावसामुळे झालेल्या गाळात जेसीबी चालू शकली नाही.



    दरम्यान ग्रामस्थांच्या मदतीने या गव्यास रस्सी ओढून बाहेर काढण्यात यश आले.वनविभाग कर्मचारी व ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न करत या गव्याला गाळातून बाहेर काढत जीवदान दिले.तसेच या गव्यावर उपचार सुरू आहेत.

    A cow stuck in the mud at Harapwade in Dhamanikhora got life donation

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : गृहमंत्री शहा म्हणाले- आसामसारखे पूर्ण देशातून घुसखोरांना हाकलून लावू; आसामचे स्वातंत्र्यसैनिक गोपीनाथ यांनी नेहरूंना आसाम भारतात ठेवण्यासाठी भाग पाडले

    Rahul Gandhi : राहुल म्हणाले- सेवानिवृत्त सैनिकांना खासगी रुग्णालयांमध्ये उपचार मिळत नाही; निश्चित सुविधा आणि रोजगारही नाही

    Mamata Banerjee : ममता म्हणाल्या- माझ्यावर तुष्टीकरणाचे आरोप, पण मी धर्मनिरपेक्ष; लोक गुरुद्वारात गेल्यावर शांत राहतात