वृत्तसंस्था
नवी दिल्ली : शाहरुख खानचा सिनेमा पठाण यांच्या समर्थनासाठी आता वेगवेगळ्या पक्षांचे राजकीय नेते मैदानात आले आहेत. 25 डिसेंबरला शाहरुखचा पठाण सिनेमागृहांमध्ये लागत आहे. त्याच्या प्रमोशनसाठी शाहरुख खान वेगवेगळे फंडे वापरतो आहे. A controversy erupted over wearing saffron-coloured clothes in Shah Rukh Khan’s new film
यातच अनेक नेते लिबरल मार्गाने शाहरुखच्या पठाणचे समर्थन करताना वादग्रस्त विधाने करत आहेत. असेच एक वादग्रस्त विधान जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूक अब्दुल्ला यांनी केले आहे. शाहरुखच्या पठाण सिनेमाची हिरोईन दीपिका पदुकोणने भगवी बिकिनी घालून बेशरम गाणे शूट केले आहे. त्या मुद्द्यावरून सोशल मीडियावर #बॉयकॉट पठाणचा ट्रेंड सुरू असताना या विषयावर बोलताना डॉ. फारूक अब्दुल्ला म्हणाले, की प्रत्येक विषयावर आपण हिंदू – मुस्लिम भेद करणे योग्य नाही. भगवा हिंदूंचा आणि हिरवा मुसलमानांचा किंवा गाय हिंदूंची आणि बैल मुसलमानांचा असे आता आपण म्हणायचे का?, असा सवाल त्यांनी केला आहे.
पण या सवालतच खरी खोच दडली आहे. किंबहुना हिंदूंच्या पूजनीय गोमाते बद्दल डिवचणारे हे वक्तव्य आहे. हेच ते फारूक अब्दुल्ला आहेत, ज्यांनी अनेकदा कोणी काय खायचे याचे अधिकार राज्यघटनेने दिले आहेत, असे म्हणत गोहत्येचे समर्थन केले आहे आणि आता पठाण सिनेमाचे समर्थन करताना त्यांनी गाय हिंदूंची आणि बैल मुसलमानांचा असे म्हणायचे का?, असा वरवर धर्मनिरपेक्ष वाटणारा, पण प्रत्यक्षात मुस्लिमांचा अहंकार सुखावणारा सवाल केला आहे. वास्तविक भगवा हिंदूंचा आणि हिरवा मुसलमानांचा असे करणे योग्य नाही, एवढेच वक्तव्य करून फारूक अब्दुल्ला थांबू शकले असते. पण त्यांनी आपल्या वक्तव्यात गाय हिंदूंची आणि मुसलमान बैल मुसलमानांचा, असे शब्द जोडून हिंदूंना डिवचले आहे.
– अब्दुल बारींचे पण समर्थन
भारत आता राहण्यालायक देश उरला नाही, असे वक्तव्य राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि लालूप्रसाद यादव यांचे निकटवर्ती अब्दुल बारी यांनी केले आहे. त्यानंतर त्यांनी घुमजाव करून हिंदुस्थान आमचा आहे. पाकिस्तान तुमच्या बापजाद्यांचा असेल, असे वक्तव्य केले आहे. या वक्तव्याचे समर्थन देखील डॉ. फारूक अब्दुल्ला यांनी केले आहे. देशात नफरतीचा माहोल आहेच. तो लवकरात लवकर सुधारला पाहिजे. आपण प्रत्येक विषयावर हिंदू – मुस्लिम भेद करून देश चालवू शकणार नाही, असे फारूक अब्दुल्ला म्हणाले आहेत.
A controversy erupted over wearing saffron-coloured clothes in Shah Rukh Khan’s new film
महत्वाच्या बातम्या