ओरिसा उच्च न्यायालयाने एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान सांगितले.
विशेष प्रतिनिधी
ओरिसा : उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, जर सहमतीने बनवलेले शारिरीक संबंध विवाहाच्या वचनावर आधारित असतील आणि काही कारणास्तव ते वचन पूर्ण होऊ शकले नाही, तर त्याला बलात्कार नाही म्हणता येणार. उच्च न्यायालयाने भुवनेश्वरमधील एका व्यक्तीवरील बलात्काराचा आरोप रद्द केला आहे. याचिकाकर्त्याची मैत्रीण असलेल्या एका महिलेने त्याच्यावर आरोप लावला होता आणि तिचा तिच्या पतीसोबत पाच वर्षांपासून वैवाहिक वाद सुरू होता. A consensual carnal relationship does not amount to rape if the promise of marriage is broken for some reason Orissa High Court
न्यायमूर्ती आरके पटनायक यांनी आदेशात म्हटले आहे की, याचिकाकर्त्यावरील फसवणुकीसारखे इतर आरोप तपासासाठी खुले ठेवण्यात आले आहेत. तसेच, चांगल्या हेतूने दिलेले, पण नंतर पाळता न येण्यासारखे वचन मोडने आणि लग्नाचे खोटे वचन देणे यात खूप फरक आहे. जर एखाद्या नातेसंबंधात कटूता आली आणि एखाद्या व्यक्तीने आपल्या जोडीदाराशी लग्न न करण्याचा निर्णय घेतला, तर आधी झालेल्या शारीरिक संबंधांना बलात्कार समजू नये. असं सांगण्यात आलं आहे.
A consensual carnal relationship does not amount to rape if the promise of marriage is broken for some reason Orissa High Court
महत्वाच्या बातम्या
- 72 हुरें चित्रपटाचे निर्माते अशोक पंडित यांना सुरक्षा; सातत्याने जिवे मारण्याच्या धमक्या येत होत्या
- बालासोर रेल्वे अपघातप्रकरणी सीबीआयची 3 रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक, सदोष मनुष्यवध आणि पुरावे नष्ट केल्याचे आरोप
- राष्ट्रवादीत संघटनात्मक निवडणुकांना कायमच वाटाण्याच्या अक्षता; पवारांनी “लोकशाही”ला दाखवला नेहमीच चव्हाटा!!
- Liquor policy scam : ‘ईडी’ने मनीष सिसोदियांच्या दोन मालमत्तांसह तब्बल ५२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त!