• Download App
    A bus full of 40 Indian passengers fell into the river ४० भारतीय प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली

    Nepal : ४० भारतीय प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली, १४ जणांचे मृतदेह बाहेर काढले

    Nepal

    बस पोखराहून काठमांडूला जात असताना ही भीषण दुर्घटना घडली


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : नेपाळमध्ये ( Nepal)  भारतीय बसला अपघात झाला. तनहुन जिल्ह्यातील मर्स्यांगडी नदीत बस पडली. बसमध्ये 40 भारतीय होते. नेपाळ पोलिसांनी सांगितले की, बस पोखराहून काठमांडूला जात होती.

    तनहुन जिल्हा पोलिसांचे डीएसपी दीपकुमार राय यांनी सांगितले की, बसचा क्रमांक UPFT7623 आहे. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला असून, त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. 16 प्रवाशांना मदत आणि बचाव पथकाने वाचवले आहे.



    मात्र, ते जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घटनेबाबत स्थानिक नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे. अपघातामुळे प्रवाशांचेही हाल होत आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, बस नदीत पडण्याचे कारणाचा स्थानिक पोलीस प्रशासन शोध घेत आहे. पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते सांगतात.

    A bus full of 40 Indian passengers fell into the river

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Malappuram : केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूत एनआयएचे १९ ठिकाणी छापे; मलप्पुरम स्फोटकसाठा प्रकरणात मोठी कारवाई

    Jacqueliene Fernandez : जॅकलिन फर्नांडिस आणि सुकेश चंद्रशेखर यांना मोठा धक्का; २०० कोटींच्या मनी लॉन्डरिंग प्रकरणात आरोप निश्चित करण्याचे न्यायालयाचे आदेश

    Supreme Court : वन्यजीव जंगलातच सुरक्षित; सुरक्षित वातावरणातून प्राण्यांना हटवणे म्हणजे क्रूरता, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी