विशेष प्रतिनिधी
मुंबई : निवडणूक सुरू असताना पत्रकार परिषद घेतल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला उद्धव ठाकरे यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिलेत. यामुळे ठाकरे यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. A blow to Uddhav Thackeray even before the result; Election Commission’s action order regarding May 20 press conference
लोकसभा निवडणुकीच्या 5 व्या टप्प्यात 20 मे रोजी मुंबई पट्ट्यातील 6 जागांसह एकूण 13 जागांवर मतदान झाले. उद्धव ठाकरे यांनी त्याच दिवशी सायंकाळी एक तातडीची पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर मतदान जाणिवपूर्वक संथ केल्याचा आरोप केला होता. तसेच भाजपवरही टीका केली होती. भाजप नेते आशिष शेलार यांनी याविरोधात निवडणूक आयोगाकडे धाव घेत ठाकरेंनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता.
भाजप नेते आशिष शेलार यांनी केली होती तक्रार
आशिष शेलार यांच्या तक्रारीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवले होते. त्यात त्यादिवशी पत्रकार परिषदेत नेमके काय झाले याची माहिती मागवली होती. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने तपासणी करून पत्रकार परिषदेचा संपूर्ण मसुदा इंग्रजीत भाषांतर करून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. त्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला भाजपच्या तक्रारीवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिलेत.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, या प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा फौजदारी गुन्हा दाखल होईल किंवा एखादा खटलाही दाखल होईल. पण यासंबंधीचा कोणताही निर्णय राज्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून घेतला जाईल.
काय आहे नियम?
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, प्रचाराच्या शेवटच्या 48 तासांत आचारसंहिता लागू होते. म्हणजे ज्यावेळी प्रचार संपतो आणि प्रत्यक्षात मतदान संपल्यानंतरच्या एका तासात कुणालाही प्रचार करता येत नाही. माध्यमांशी संवाद साधताना मतदारांना मतदानाला येण्याचे आवाहन करता येते. पण कोणत्याी थेट पक्षावर, व्यक्तीवर किंवा संस्थेवर कोणत्याही प्रकारचे आरोप करता येत नाही.
काय म्हणाले होते ठाकरे?
पण उद्धव ठाकरे यांनी 20 तारखेच्या आपल्या तातडीच्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर जाणिवपूर्वक मतदान संथगतीने घेतल्याचा आरोप केला होता. उद्धव ठाकरे म्हणाले होते की, निवडणूक आयोग भाजपची चाकरी करत आहे. ज्या ठिकाणी आम्हाला चांगली लीड मिळू शकते, त्या ठिकाणी जाणीवपूर्वक मतदारांना त्रास दिला जात असल्याचा घटना घडत आहेत. त्यामुळे मतदारांनी सायंकाळी 6 पर्यंत मतदान केंद्रात येऊन मतदान करावे. विशेषतः मतदानाला उशीर झाला तरी आपले मतदान होईपर्यंत निवडणूक अधिकाऱ्यांना सोडू नये, असे ते म्हणाले होते. आता त्यांचे हेच विधान त्यांच्यासाठी अडचणीचे ठरणार आहे.
A blow to Uddhav Thackeray even before the result; Election Commission’s action order regarding May 20 press conference
महत्वाच्या बातम्या
- अंतरवलीतले सलोख्याचे वातावरण बिघडले, मनोज जरांगेंना उपोषणाची परवानगी नको; ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र!!
- निवडणूक आयोगाने सांगितला आकडा 64.20 लाख; भारतीय मतदारांनी घातला जागतिक विक्रमाला हात!!
- केजरीवालांचे तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण; 5 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी; म्हणाले- तुरुंगातून कधी परत येईन माहीत नाही