वृत्तसंस्था
रुद्रप्रयाग : उत्तराखंडमधील बद्रीनाथ महामार्गावर शनिवारी 15 जून रोजी सकाळी 11 वाजता एक टेम्पो ट्रॅव्हलरचा ताबा सुटून अलकनंदा नदीत पडला. या अपघातात 14 पर्यटकांचा मृत्यू झाला, तर 12 जण जखमी झाले आहेत. 7 गंभीर जखमींना हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट करून ऋषिकेश एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे.A big plan to eliminate terrorists from Jammu region… Amit Shah will hold a high level meeting, NSA Doval and RAW chief will also be present
ट्रॅव्हलरमध्ये 26 प्रवासी होते. सर्वजण बद्रीनाथ दर्शनासाठी जात होते. हे पर्यटक नोएडा आणि दिल्लीचे आहेत. अपघातामागील कारण हे चालकाला झोप लागल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
ज्या ठिकाणी अपघात झाला तो ऑल वेदर हायवे आहे. गाडी बाऊंड्री तोडून दरीत 660 फूट (250 मीटर) पेक्षा जास्त खाली पडला. नदीच्या काठावर असल्याने अलकनंदाच्या जोरदार प्रवाहात प्रवासी वाहून गेले नाहीत.
घटनास्थळाजवळ रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू आहे. लोकांना वाचवण्यासाठी 3 मजुरांनी नदीत उड्या घेतल्या. यापैकी 2 जण बचावले, परंतु एकाचा मृत्यू झाला.
पर्यटक दिल्ली-एनसीआरमधील
ही ट्रॅव्हलर गाडी हरियाणा क्रमांकाची असल्याचे पोलिसांनी सांगितले. हे दिल्ली-एनसीआरमध्ये राहणाऱ्या पर्यटकांनी बुक केले होते. शुक्रवारी संध्याकाळी ते दिल्लीहून निघाले. चालक रात्रभर गाडी चालवत राहिला. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.
घटनेच्या वेळी महामार्गावर फारशी रहदारी नसल्याने चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाला असावा, अशी शक्यता प्राथमिक तपासात व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार डीएम गढवाल यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यामध्ये प्रवाशांचीही चौकशी करण्यात येत आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले- स्थानिक प्रशासन आणि एसडीआरएफचे पथक मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या वैद्यकीय केंद्रात पाठवण्यात आले आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
A big plan to eliminate terrorists from Jammu region… Amit Shah will hold a high level meeting, NSA Doval and RAW chief will also be present
महत्वाच्या बातम्या
- लोकसभेच्या उपाध्यक्षपदावर I.N.D.I.Aचा दावा, न मिळाल्यास अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता
- लोकसभा निवडणुकीत महागाईच्या नावाने बोंबाबोंब; पण कर्नाटकात काँग्रेसच्या राज्यात पेट्रोल – डिझेलची दरवाढ!!
- गृहमंत्री अमित शाह आज जम्मू-काश्मीरला भेट देणार
- महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी फसवले; राजू शेट्टींचा संताप!!