• Download App
    मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या सुरक्षेत मोठी चूक, पोलिसांच्या गणवेशात आला मद्यधुंद तरुण!|A big mistake in the security of Chief Minister Mohan Yadav a drunken youth came in police uniform

    मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या सुरक्षेत मोठी चूक, पोलिसांच्या गणवेशात आला मद्यधुंद तरुण!

    सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आलेल्या तरुणींशी तो बोलण्याचा प्रयत्न करत होता.


    विशेष प्रतिनिधी

    मुख्यमंत्री मोहन यादव शहडोलला पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या सुरक्षेतील मोठी त्रुटी समोर आली आहे. एक अज्ञात व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत पोलिसांचा गणवेश परिधान केलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये घुसला आणि त्यांच्यामध्ये उभा होता. दुपारी 12 च्या सुमारास पॉलीटेक्निक मैदानावर आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मोहन यादव ज्या ठिकाणी येणार होते त्या ठिकाणाजवळ तो पोहचला होता.A big mistake in the security of Chief Minister Mohan Yadav a drunken youth came in police uniform



    मध्यप्रदेश पोलिसांचा गणवेश परिधान करून हा तरुण पोलिसांसमोर उभा राहून आपला रुबाब दाखवत होता. यादव ज्या गेटमधून प्रवेश करणार होते त्याच गेटमधून सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणाऱ्या मुली सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रवेश करत होत्या. त्याचवेळी हा मद्यधुंद अवस्थेतील तरुण त्यांच्यामध्ये शिरला आणि बोलू लागला.

    हा अज्ञात पोलीस मद्यधुंद अवस्थेत मुलींशी कसा बोलतोय, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता तो पळून जाऊ लागला. मोठी गोष्ट म्हणजे अधिकारी आणि पोलिसांच्या उपस्थितीत तो बाहेर आला आणि पळू लागला, पण एकाही पोलिसाने त्याला पकडले नाही.

    प्रभारी म्हणाले आमच्या टीममध्ये नाही

    येथे गेटचे प्रभारी टीआय रघुवंशी यांनी सांगितले की, तो कोण होता, याबाबत आमच्याकडे कोणतीही माहिती नाही. माझ्या टीममध्ये 9 जण आहेत, त्यांचा त्यात समावेश नाही. तो कोण आहे हे शोधून काढू असे सांगितले.

    A big mistake in the security of Chief Minister Mohan Yadav a drunken youth came in police uniform

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    Judge Cash case : जज कॅश केस, सरन्यायाधीशांनी PM-राष्ट्रपतींना अहवाल सोपवला; तीन न्यायाधीशांच्या समितीकडून चौकशी

    अमेरिका + पाकिस्तान यांनीच ceasefire शब्द वापरला; भारताने फक्त firing आणि military action थांबविल्याचे सांगितले; याचा नेमका अर्थ काय??