विशेष प्रतिनिधी
धुळे : धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला ऐन लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या तोंडावरच जोरदार धक्का बसला आहे. नाशिक ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष व प्रदेश सरचिटणीस तुषार शेवाळे यांनी आज धुळ्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. धुळ्यात कॉंग्रेसकडून डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिल्याने ते गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. त्यामुळेच त्यांनी ऐनवेळी कॉंग्रेसला धक्का दिल्याचे बोलले जात आहे.A big blow to the Congress in the dust of the battlefield; State General Secretary Tushar Shewale joins BJP
मालेगावचे डॉ. ठाकरेही भाजपात
धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून तुषार शेवाळे यांनी लोकसभेची उमेदवारी मागितली होती. मात्र उमेदवारी न मिळाल्यामुळे शेवाळे नाराज होते. काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या तुषार शेवाळे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. तुषार शेवाळे यांच्यासोबत मालेगाव काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
उमेदवारी न मिळाल्याने शेवाळेंची नाराजी
तुषार शेवाळे हे धुळे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. गेल्या तीन ते चार वर्षांपासून ते धुळे व नाशिक जिल्ह्यात ते चांगलेच सक्रीय झाल्याचे पाहायला मिळाले होते. काँग्रेसतर्फे यंदा धुळे लोकसभेसाठी डॉ. शेवाळे व धुळे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर हे प्रबळ दावेदार असतानाही त्यांचा पत्ता कट करत नाशिकच्या माजी महापौर डॉ. शोभा बच्छाव यांना धुळ्यातून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे शेवाळे नाराज झाल्याचे दिसून आले होते.
शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध
शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर डॉ. तुषार शेवाळे आणि शाम सनेर यांनी आयात उमेदवार चालणार नाही, अशी भूमिका घेत आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. यानंतर शोभा बच्छाव या मालेगाव तालुका काँग्रेस कमिटीत डॉ. शेवाळे व पदाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी घ्यायला आल्या असताना त्यांना जोरदार विरोध करण्यात आला होता. त्यामुळे शोभा बच्छाव यांना माघारी फिरण्याची वेळ आली होती.
A big blow to the Congress in the dust of the battlefield; State General Secretary Tushar Shewale joins BJP
महत्वाच्या बातम्या
- फोडाफोडीच्या राजकारणावरून आज बोंबाबोंब, पण त्या राजकारणाचे तर शरद पवारच जनक!!
- पश्चिम बंगालमधील संदेशखळीमध्ये पुन्हा तणावाचे वातावरण!
- Alamgir Alam ED Summons : काँग्रेस नेते आलमगीर आलम यांना ‘ED’ने बजावले समन्स!
- अदानी + अंबानींविरोधात राहुल गांधींचा कंठशोष; पण पैसे दिल्यास काँग्रेस नेते मूग गिळून गप!!