जाणून घ्या, हार्दिकच्या जागी कोणत्या खेळाडूला मिळाला संघात प्रवेश
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या विश्वचषक 2023 मधून बाहेर पडला आहे. आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी ही बातमी मोठा धक्का आहे. A big blow to Team India injured Hardik Pandya out of the World Cup
टीम इंडियाच्या शेवटच्या लीग मॅच किंवा सेमीफायनल किंवा फायनलपूर्वी हार्दिक तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा होती, पण आता हे स्पष्ट झाले आहे की 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये तो टीम इंडियासाठी कोणताही सामना खेळणार नाही. त्याच्या जागी प्रसिध कृष्णाचा संघात प्रवेश झाला आहे.
2023 च्या विश्वचषकात भारतीय संघ आतापर्यंत अजिंक्य ठरला आहे. सातपैकी सात सामने जिंकून भारताने उपांत्य फेरी गाठली आहे. आता टीम इंडियाला 5 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि 12 नोव्हेंबरला नेदरलँड्सविरुद्ध उर्वरित सामने खेळायचे आहेत. यानंतर (15 किंवा 16 नोव्हेंबर) उपांत्य फेरी होणार आहे. त्यानंतर 19 नोव्हेंबरला विश्वचषकाचा अंतिम सामना होणार आहे.
अशा परिस्थितीत हार्दिकच्या गैरहजेरीमुळे टीम इंडियाला त्यांच्या संघात नक्कीच त्याची उणीव भासेल. ताज्या अपडेटनुसार, स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या घोट्याच्या दुखापतीतून सावरण्यात अपयशी ठरला असून तो स्पर्धेतील उर्वरित सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही.
A big blow to Team India injured Hardik Pandya out of the World Cup
महत्वाच्या बातम्या
- Cricket World cup 2023 : मॅट हेन्री विश्वचषकातून बाहेर; दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात हाताला दुखापत; न्यूझीलंड संघात जेमिसनचा समावेश
- नेपाळमध्ये 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप, 128 जणांचा मृत्यू; दिल्ली-एनसीआर, एमपी-यूपीतही हादरली धरणी
- जातनिहाय जनगणना, जात आरक्षण राजकीय आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी व्होट बँक बांधणीचा भाजपचा मास्टर प्लॅन
- झिम्मा २’ चित्रपटात रिंकू राजगुरु साकारणार ‘हे’ पात्र!