कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते येडियुरप्पा यांनी ट्वीटद्वारे दिली माहिती
विशेष प्रतिनिधी
बंगळुरू : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी सोमवारी सांगितले की, राज्याचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेली अतिशय सुंदर अशी ‘राम लल्ला’ची मूर्ती अयोध्येतील भव्य राम मंदिरात स्थापित केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन करणार आहेत.A beautiful idol sculpted by Arun Yogiraj was chosen for the sanctum sanctorum of the Ram temple
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपला आनंद व्यक्त करताना येडियुप्पा म्हणाले, यामुळे राज्यातील तमाम रामभक्तांचा अभिमान आणि आनंद द्विगुणित झाला आहे. कारागीर योगीराज अरुण यांचे हार्दिक अभिनंदन.
येडियुरप्पा यांचे पुत्र आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष बीवाय विजयेंद्र यांनीही योगीराज यांचे कौतुक केले. विजयेंद्र म्हणाले, ‘अद्वितीय शिल्पकार अरुण योगीराज यांनी साकारलेली रामलल्लाची मूर्ती 22 जानेवारीला अयोध्येत स्थापित होणे ही म्हैसूरची, कर्नाटकसाठी सन्मानाची बाब आहे.’
श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राने ‘रामलल्ला’ची मूर्ती घडवण्यासाठी निवडलेल्या तीन शिल्पकारांपैकी अरुण योगीराज एक होते. योगीराज म्हणाले, ‘मला आनंद आहे की, ‘रामलल्ला’ची मूर्ती घडवण्यासाठी निवडलेल्या देशातील तीन शिल्पकारांपैकी मी होतो.’
A beautiful idol sculpted by Arun Yogiraj was chosen for the sanctum sanctorum of the Ram temple
महत्वाच्या बातम्या
- मोदी तामिळनाडू, लक्षद्वीप आणि केरळच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार
- गँगस्टर गोल्डी ब्रारला गृह मंत्रालयाने घोषित केले दहशतवादी
- IIT-बीएचयूच्या विद्यार्थिनीवर गँगरेप करणाऱ्या सर्व आरोपींना अटक; गन पॉइंटवर कपडे काढून बनवला होता व्हिडिओ
- केजरीवाल म्हणाले- आम आदमी पक्ष इंडियाचा भाग, लोकसभेत जेवढ्या जागा मिळतील, सर्व जिंकू