• Download App
    हंदवाडा : जिथून फक्त दहशतवादाच्या बातम्या यायच्या तिथे 108 फुटी तिरंगा फडकला!!; प्रशासन + HDFC Bank चा उपक्रमA 108-feet high National Flag installed at Langate Park in Handwara, J&K

    हंदवाडा : जिथून फक्त दहशतवादाच्या बातम्या यायच्या तिथे 108 फुटी तिरंगा फडकला!!; प्रशासन + HDFC Bank चा उपक्रम

    वृत्तसंस्था

    हंदवाडा : ज्या जम्मू काश्मीर मधल्या कुपवाडा जिल्ह्यातून फक्त दहशतवादाच्या थैमानाच्या बातम्या यायच्या, त्या कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा शहरातून देशभक्तीच्या अविष्काराची बातमी आली आहे. हंदवाडा मधील लंगेट पार्कमध्ये 108 फुटी तिरंगा फडकविण्यात आला आहे. स्थानिक प्रशासन आणि HDFC Bank संयुक्त उपक्रम घेऊन हा तिरंगा फडकवला आहे. या कार्यक्रमास वरिष्ठ सैन्यदल अधिकारी, बँक अधिकारी त्याचबरोबर हंदवाडामधील शाळांचे शेकडो विद्यार्थी हजर होते. A 108-feet high National Flag installed at Langate Park in Handwara, J&K

    जम्मू काश्मीर मधील जनता देशप्रेमी आहे. परंतु मध्यंतरीच्या काळात तेथे स्थानिक युवकांना हाताशी धरून पाकिस्तानने दहशतवादाचे थैमान घातले होते. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर मधले 370 कलम हटवल्यानंतर जे जनता कल्याणकारी उपक्रम हाती घेतले, त्यातून राज्यातले वातावरण बदलले असून तेथे रोजगार आणि गुंतवणूक केंद्रित विविध उपक्रम देखील सुरू झाले आहेत. त्याचबरोबर जम्मू कश्मीर मधल्या जनतेचा देशप्रेमाचा अविष्कार देखील तितक्याच उत्कटतेने दिसतो आहे. हंदवाडा मधील लंगेट पार्कमध्ये फडकलेला हा 108 फुटी तिरंगा त्याचीच साक्ष देतो आहे. या उपक्रमात देशातली एक अग्रगण्य बँक HDFC Bank ने सहयोग दिला आहे. हे काश्मीर मधील वातावरण रोजगार आणि गुंतवणुकीसाठी किती अनुकूल झाले आहे, त्याचेच निदर्शक मानले जात आहे.

    शिवाय ज्या लंगेट पार्कमध्ये हा तिरंगा फडकला आहे, त्याच लंगेट विभागातील देशप्रेमी जनतेने कुख्यात दहशतवादी मकबूल बट याला पकडून भारतीय सैन्य दलाच्या हवाली केले होते. हा तोच मकबुल बट होता, ज्याने जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिक युवकांना हाताशी धरून त्यांना पाकिस्तानच्या आयएसआयच्या हस्तकांकडून ट्रेनिंग दिले होते. त्यांनी राज्यात दहशतवादचे थैमान घातले होते.

    परंतु, आता जम्मू काश्मीर मधले वातावरण पूर्ण बदलल्याने जिथून फक्त दहशतवादाच्या थैमानाच्या बातम्या यायच्या त्या कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा मधील लंगेट पार्कमध्ये डौलाने तिरंगा फडकला आहे आणि त्याला देशातील अग्रगण्य HDFC Bank ने सहयोग दिला आहे, याला विशेष महत्त्व आहे.

    A 108-feet high National Flag installed at Langate Park in Handwara, J&K

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार