• Download App
    Gujarat गुजरातेत बंद फ्लॅटमधून तब्बल ९५.५० किलो सोने जप्त, डीआरआय व एटीएसची संयुक्त कारवाई

    गुजरातेत बंद फ्लॅटमधून तब्बल ९५.५० किलो सोने जप्त, डीआरआय व एटीएसची संयुक्त कारवाई

    वृत्तसंस्था

    अहमदाबाद : अहमदाबादमध्ये एका बंद फ्लॅटमधून ९५.५ किलोग्रॅम सोने व ६० लाख रुपये रोकड जप्त करण्यात आले. एकूण जप्ती ८७.५० कोटी रुपयांची असल्याचे सांगण्यात आले. डीआरआय व गुजरात एटीएसने पाच दिवसांच्या निगराणीनंतर दुपारी अडीचच्या सुमारास पालडी भागातील अविष्कार अपार्टमेंटच्या फ्लॅट नंबर १०४ मध्ये छापा टाकण्यात आला. तेव्हा फ्लॅट बंद दिसून आला. वकिलांच्या माध्यमातून चावी मागवून फ्लॅट उघडण्यात आला. जप्त कलेले सोने आयात स्वरूपाचे आहे.

    व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार परदेशी बिस्किटाची मागणी भारतात वाढू लागली आहे. कारण शुद्धतेच्या बाबतीत परदेशी बिस्किटांना महत्त्व दिले जाते. हा फ्लॅट मेघ शाह व महेंद्र शाह नावाच्या दोन भावांनी भाड्याने घेतला आहे. दोघेही शेअर बाजारातील ऑपरेटर आहेत. बिल्डर लॉबीला देखील वित्त पुरवठा करतात. आजूबाजूच्या लोकांच्या म्हणण्यानुसार फ्लॅट बहुतांशवेळा बंद असतो. त्यातही लोकांची ये-जा सुरू असे.

    95.50 kg gold seized from closed flat in Gujarat, joint operation by DRI and ATS

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा

    Zardari Warns : झरदारी म्हणाले- पाकिस्तान पुन्हा युद्धासाठी तयार, मे महिन्यात भारताला समजले की युद्ध मुलांचा खेळ नाही

    Suvendu Adhikari : सुवेंदु अधिकारी म्हणाले- बांगलादेशला गाझासारखा धडा शिकवला पाहिजे