• Download App
    लुधियानामध्ये विषारी वायू गळतीमुळे ९ जणांचा मृत्यू अनेकजण बेशुद्ध 9 dead many unconscious due to toxic gas leak in Ludhiana

    लुधियानामध्ये विषारी वायू गळतीमुळे ९ जणांचा मृत्यू, अनेकजण बेशुद्ध

     NDRF टीम घटनास्थळी पोहोचली, बचाव मोहीम सुरू

    विशेष प्रतिनिधी

    लुधियाना : पंजाबमधील लुधियानामध्ये विषारी वायू गळतीमुळेन नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेत अनेकजण बेशुद्ध झाले आहेत. घटनास्थळी गोंधळाचे वातावरण आहे. नाकाबंदी करत पोलीस कोणालाही घटनास्थळी जाऊ देत नाहीत. बचाव मोहीम राबवून लोकांना घरातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी नेण्यात येत आहे. 9 dead many unconscious due to toxic gas leak in Ludhiana

    लुधियानाच्या गयासपूर भागात ही दुर्घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गयासपूर परिसरात अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. रुग्णवाहिकेचीही व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अचानक गॅस गळती झाल्याने चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. जवळच्या कारखान्यातून वायू गळती झाल्याचा दावा त्यांनी केला.

    लुधियाना पश्चिमच्या एसडीएम स्वाती यांनी सांगितले की, ही गॅस गळतीचीच घटना आहे. एनडीआरएफची टीम येथे पोहोचली आहे. लोकांना वाचवण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक पथक तपासानंतर गॅस गळतीचा स्रोत उघड करेल. तज्ज्ञांची टीम गॅस कोणता आहे हे देखील उघड करेल.

    9 dead many unconscious due to toxic gas leak in Ludhiana

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शाह यांचे शीर छाटून टेबलावर ठेवावे विधान, महुआ मोईत्रा यांच्यावर टीकेची झाेड,

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!