• Download App
    केदारनाथ : 9 कारागीर अन् 18 मॉडेल, जाणून आदि शंकराचार्यांच्या 12 फुटी पुतळ्याच्या उभारणीमागचे रहस्य ।9 artisans and 18 models took one year To construct Adi Shankaracharya statue For Kedarnath Dham

    केदारनाथ : ९ कारागीर अन् १८ मॉडेल, जाणून आदि शंकराचार्यांच्या १२ फुटी पुतळ्याच्या उभारणीमागचे रहस्य

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी महत्त्वाच्या प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी देवभूमीच्या भेटीदरम्यान उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराच्या आवारात आदि शंकराचार्यांच्या 12 फुटी पुतळ्याचे अनावरण केले. 9 artisans and 18 models took one year To construct Adi Shankaracharya statue For Kedarnath Dham


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी महत्त्वाच्या प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी देवभूमीच्या भेटीदरम्यान उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराच्या आवारात आदि शंकराचार्यांच्या 12 फुटी पुतळ्याचे अनावरण केले.

    2013 च्या उत्तराखंडच्या पुरात मूळ पुतळा वाहून गेल्यानंतर त्याच्या पुनर्बांधणीनंतर पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. म्हैसूरचे कलाकार अरुण योगीराज यांच्यासह नऊ कारागिरांच्या मेहनतीने हा पुतळा एका वर्षाच्या कालावधीत तयार करण्यात आला आहे.

    ‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या माहितीनुसार, केदारनाथ मंदिराच्या मागे असलेल्या या मूर्तीची पुनर्बांधणी समाधी क्षेत्राच्या मध्यभागी करण्यात आली आहे. अहवालानुसार, आदिगुरू शंकराचार्य पुतळ्याचे सुमारे 18 मॉडेल तयार करण्यात आले होते, परंतु पंतप्रधान मोदींच्या संमतीनुसार केवळ एकाची निवड करण्यात आली होती.

    शंकराचार्यांच्या पुनर्निर्मित पुतळ्याचे वजन 35 टन आहे आणि ते म्हैसूरच्या शिल्पकारांनी क्लोराईट शिस्टपासून बनवले आहे, जो पाऊस, सूर्यप्रकाश आणि कठोर हवामानाचा सामना करण्यासाठी ओळखला जातो.



    वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, “हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. नऊ महिने दिवसाचे किमान 14 तास परिश्रम घेतल्यानंतर आम्ही शंकराचार्यांची मूर्ती पूर्ण केली,” असे शिल्पकार योगीराज यांनी म्हटले आहे.

    दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी सांगितले की, मी केदारनाथ येथील पुनर्विकास कामांचा नियमितपणे आढावा घेत आहे. उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथ येथे लोकांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, “मी येथे सुरू असलेल्या विविध कामांच्या प्रगतीचा ड्रोन फुटेजद्वारे आढावा घेतला. या कामांसाठी त्यांनी केलेल्या मार्गदर्शनासाठी मी येथील सर्व ‘रावलांचे’ आभार मानू इच्छितो.”

    पंतप्रधानांची केदारनाथ धामला ही पाचवी भेट आहे; त्यांनी यापूर्वी केदारनाथ मंदिराला 2019 मध्ये भेट दिली होती. आदि शंकराचार्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याव्यतिरिक्त, पीएम मोदींनी 130 कोटींच्या विविध पुनर्विकास प्रकल्पांचे उद्घाटनही केले.

    9 artisans and 18 models took one year To construct Adi Shankaracharya statue For Kedarnath Dham

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची