प्रतिनिधी
बेंगलोर : कर्नाटकात भाजपचा पराभव करून काँग्रेसने 135 जागांचे प्रचंड बहुमत मिळवले. पण ते बहुमत कसे मिळवले?? कोणामुळे मिळवले?? याचे “रहस्य” आता उघडकीस आले आहे. कर्नाटकात काँग्रेसच्या विजयात 88% मुस्लिम मतदारांचा वाटा आहे, असा दावा करत त्या बदल्यात उपमुख्यमंत्री पद आणि 5 मंत्रिपदे मुस्लिमांना द्यावीत, अशी आग्रही मागणी पुढे आली आहे. 88% muslims voted for Congress, demands dy. Chief ministership and 5 ministerships
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 88% मुस्लिम मतदारांनी काँग्रेसला मतदान केले. मुस्लिम समाजामुळे समाजामुळे काँग्रेसला प्रचंड बहुमत मिळाले. त्यामुळे आता काँग्रेसने मुस्लिम समाजाला उपमुख्यमंत्रिपद आणि 5 मंत्रिपदे द्यावीत, अशी मागणी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शफी सादी यांनी केली आहे.
कर्नाटकातील 13 % मुस्लिम लोकसंख्येपैकी 88 % मुस्लिमांनी काँग्रेसला मतदान केले. काँग्रेस पक्षाला मतदान करण्यासाठी आम्ही सर्व मशिदींमध्ये प्रचार आणि जनजागृती केली, असे सांगून सादी म्हणाले, कर्नाटकात काँग्रेसचे 73 आमदार जिंकून देण्यात मुस्लिमांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे मुस्लिमांचा सत्तेमध्ये मोठा वाटा मिळवण्याचा हक्क बनतो. म्हणूनच काँग्रेसने मुस्लिमांना आता उपमुख्यमंत्री पद आणि पाच मंत्रिपदे द्यावीत, अशी मागणी शफी सादी यांनी केली.
5 मुस्लिम मंत्री होते
कर्नाटकातील सर्व 224 मतदारसंघांपैकी 15 मतदारसंघांमध्ये मुस्लिमांनी निवडणूक लढवली. त्यापैकी 9 जण विजयी झाले आहेत. यापूर्वी एस. एम. कृष्णा हे काँग्रेसचे मुख्यमंत्री असताना मुस्लिम समाजातून निवडून आलेल्या 5 आमदारांना सरकारमध्ये मंत्रिपदे दिली होती. सध्या कृष्णा भाजपमध्ये आहेत.
शफी सादी यांच्या मागणीवर अद्याप काँग्रेसने कोणतेही अधिकृत उत्तर दिलेले नाही. काँग्रेसने विधिमंडळ पक्षाची बैठक घेऊन मुख्यमंत्री निवडीचे सर्वाधिकार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे सोपविले आहे.
88% muslims voted for Congress, demands dy. Chief ministership and 5 ministerships
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींची मोहब्बत की दुकान शुरू; याचा अर्थ हिजाबला अच्छे दिन, पीएफआय कारवाया पर्दानशीन!!
- केरळमध्ये NCB आणि नौदलाची मोठी कारवाई; तब्बल १२ हजार कोटींचे २५०० किलो ड्रग्ज जप्त!
- कर्नाटकात जेडीएस, महाराष्ट्रात राष्ट्रवादी; काँग्रेससाठी दोन्ही पक्ष “राजकीय गिऱ्हाईक”!!
- उत्तर प्रदेशात स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय होऊनही विरोधकांचा ईव्हीएम विरोधात आरडाओरडा का नाही??; “रहस्य” काय??