• Download App
    पेटंटसाठी अर्ज करणाऱ्या सर्वच शिक्षण संस्थांच्या शैक्षणिक शुल्कात ८० टक्के कपात; केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल यांची घोषणा। 80% reduction in tuition fees of all educational institutions applying for patents; Union Commerce and Industry Minister Piyush Goyal's announcement

    पेटंटसाठी अर्ज करणाऱ्या सर्वच शिक्षण संस्थांच्या शैक्षणिक शुल्कात ८० टक्के कपात; केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल यांची घोषणा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पेटंटसाठी अर्ज करणाऱ्या सर्व मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांच्या शिक्षण शुल्कात ८० टक्क्यांची कपात करण्याची घोषणा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल यांनी केली. या मुळे देशी अथवा परदेशातील संस्थांना देखील या शुल्क कपातीचा लाभ मिळणार आहे. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजकडून (सीआयआय) बौद्धिक संपदा विषयावर आयोजित एका वेबिनारमध्ये गोयल बोलत होते.80% reduction in tuition fees of all educational institutions applying for patents; Union Commerce and Industry Minister Piyush Goyal’s announcement



    गोयल म्हणाले, सरकारच्या स्वामित्वाखाली असणाऱ्या मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांना यापूर्वी शैक्षणिक शुल्कात ८० टक्के सवलत होती. आता त्यात बदल केला आहे.

    ते म्हणाले, ८० टक्के शुल्क सवलतीचा लाभ हा सर्व मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्था, विद्यापीठं, शाळा आणि महाविद्यालयांना मिळेल. सरकारी वा सरकारच्या मदतीनं चालणाऱ्या खासगी संस्था. त्या देशात किंवा परदेशात असोत. त्यांना शुल्कात सवलत दिली जाईल.

    प्रकाशन शुल्क आता ८५ हजार रुपयांवर

    शैक्षणिक शुल्कातील सवलतीमुळे कोणत्याही संस्थेचं प्रकाशन शुल्क ४ लाख २४ हजार ५०० रुपयांवरून ८५ हजार रुपयांवर येईल. यामुळे विद्यापीठांना खूप मोठं प्रोत्साहन मिळेल. अनेक नवी विद्यापीठं आणि शैक्षणिक संस्था याचा लाभ घेतील, अशी मला आशा आहे, असं गोयल म्हणाले.

    80% reduction in tuition fees of all educational institutions applying for patents; Union Commerce and Industry Minister Piyush Goyal’s announcement

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट