मुद्रा योजनेमुळे युवक नोकरी शोधणारे ऐवजी रोजगार निर्माण करणारे होत आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : प्रधानमंत्री मुद्रा योजनेला काल, ८ एप्रिल रोजी आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने ८ एप्रिल २०१५ रोजी ही योजना सुरू केली. आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुद्रा योजनेमुळे स्वयंरोजगाराला मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली आहे. या योजनेमुळे अल्पावधीतच अनेकांचे जीवन बदलले आहे. मुद्रा योजनेमुळे युवक नोकरी शोधणारे ऐवजी रोजगार निर्माण करणारे होत आहेत. या योजनेच्या सर्वाधिक लाभार्थी महिला आहेत. 8 years of Mudra Yojana Dreams of more than 40 crore people come true
पंतप्रधान मोदींनी मुद्रा योजनेला ८ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कौतुक केले आहे. MyGov India च्या ट्विटला प्रत्युत्तर देताना पंतप्रधान म्हणाले की मुद्रा योजनेने बँक नसलेल्यांना निधी उपलब्ध करून देण्यात आणि असंख्य भारतीयांसाठी सन्मानाचे जीवन तसेच समृद्धी सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आज आपण #8YearsOfMudraYojana साजरी करत असताना, ज्यांनी याचा फायदा घेतला आणि रोजगार निर्माण करणारे बनले त्या सर्वांच्या उद्योजकतेला मी सलाम करतो.
अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत आठ वर्षांत, सरकारने PM मुद्रा कर्जाअंतर्गत ४० कोटींहून अधिक लोकांना २३.२ लाख कोटींची रक्कम वितरित केली आहे. मुद्रा योजनेच्या ८ व्या वर्धापनदिनानिमित्त अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, ‘’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या या योजनेने सूक्ष्म उद्योगांसाठी सहज आणि अडथळेविरहित कर्ज उपलब्ध करून दिले आहे आणि मोठ्या संख्येने तरुण उद्योजकांना सक्षम केले आहे. त्यांचा व्यवसाय सुरू करण्यास मदत झाली आहे.’’ याचबरोबर त्यांनी हेही सांगितले की ही योजना सुरू झाल्यापासून २४ मार्च २०२३ पर्यंत ४०.८२ कोटी कर्ज खात्यांमध्ये २३.२ लाख कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
8 years of Mudra Yojana Dreams of more than 40 crore people come true
महत्वाच्या बातम्या
- आज PM मोदी एकाच वेळी करणार दोन वंदे भारताचे लोकार्पण, या राज्यांतील प्रवाशांना मिळणार लाभ
- अदानींच्या समर्थनाचे पवारांचे वक्तव्य, काँग्रेस हायकमांडला टोचून महाराष्ट्रातल्याच महाविकास आघाडीला सुरुंग!!
- सावरकर मुद्द्यावर बॅकफूटवर ढकलेले काँग्रेस नेतृत्व अदानी मुद्द्यावर पवारांच्या मुलाखतीच्या डावपेची राजकारणापुढे झुकेल??
- नऊ वर्षांत तब्बल २३ दिग्गज नेत्यांनी काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी; प्रत्येकाचं कारण मात्र एकच ते म्हणजे…