वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतात घातपाती कारवाया करण्यासाठी टेरर फंडिंग करणारी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआय आणि सोशल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ इंडिया अर्थात एसडीपीआय यांच्यावरील छाप्यांची दुसरी फेरी नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सी अर्थात एनआयएनने सुरू केली असून विविध राज्यांमधल्या पोलिसांच्या स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम्स अर्थात एसआयटी यांच्याशी समन्वय राहून तब्बल 8 राज्यांमध्ये छापेमारी सुरू आहे. यामध्ये 100 हून अधिक म्होरक्यांना ताब्यात घेतले असून दिल्लीतील शाहीन बाग आणि निजामुद्दीन येथून 30 म्होरक्यांना ताब्यात घेतले आहे. तसेच मालेगावातून पीएफआयच्या म्होरक्यांना अटक केली आहे. 8 states across the country including Shaheen Bagh in Delhi, Nizamuddin
नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) पुन्हा एकदा एक्शनमोडमध्ये आली असून, अधिकाऱ्यांनी देशभरात कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. देशभरात पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ठिकाणांवर छापेमारीची दुसरी फेरी सुरू आहे. एनआयएसह इतर यंत्रणांनी पुन्हा एकदा देशभरातील पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या अनेक ठिकाणांवर छापे घातले आहेत.
केरळात तोडफोड; NIA च्या छाप्यांविरोधात PFI चा हिंसक बंद; म्होरक्यांवर हायकोर्टाचा खटला दाखल
एनआयएने काही दिवसांपूर्वी संपूर्ण देशभरातील पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ठिकाणांवर छापेमारी केली होती. या कारवाईत अनेकांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. आता याच आधारे राज्यांतील पोलीसांच्या एटीएसच्या मदतीने पुन्हा एकदा एनआयएने छापे घातले आहेत. 8 राज्यांमध्ये पीएफआयच्या ठिकाणांवर छापे घातले आहेत. राज्यातून औंरगाबादमधून 12 जणांना, सोलापूर 1, ठाण्यातून 4 तर कल्याण भिवंडीमधून प्रत्येकी 1 संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.
कर्नाटकातून पीएफआय अध्यक्षाला अटक
कर्नाटक पोलिसांनी मंगळवारी सकाळी जिल्ह्यातील पीएफआय अध्यक्ष आणि एसडीपीआय सचिवाला अटक केली आहे. पीएफआयचे जिल्हाध्यक्ष अब्दुल करीम आणि एसडीपीआयचे सचिव शेख मस्कसूद यांना अटक करण्यात आली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारी म्हणून अटक करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
8 states across the country including Shaheen Bagh in Delhi, Nizamuddin
महत्वाच्या बातम्या
- गुजरातचे सिंह महाराष्ट्रात येणार, तर महाराष्ट्राचे वाघ गुजरात मध्ये जाणार ; संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येणार सिंहाची जोडी!!
- NASA DART Mission: पृथ्वी वाचवण्याची चाचणी यशस्वी, नासाचे अवकाशयान लघुग्रहाला धडकले
- काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून गेहलोत बाहेर : वेणुगोपाल, खरगे, दिग्विजय, वासनिक शर्यतीत
- महाराष्ट्रात लवकरच 20000 पोलीस पदांची भरती; देवेंद्र फडणवीसांची घोषणा