विशेष प्रतिनिधी
पुणे : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 10 पैकी 8 जागा मिळवण्याच्या खुशीची खुमारी; शरद पवार वारकऱ्यांसोबत करणार पायी आषाढी वारी!!, असे खरंच घडणार आहे.8 out of 10 happy hangovers; Pawar will do Ashadhi Vari on foot with Varakras!!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यंदाच्या आषाढी वारी आषाढी पालखी सोहळ्यात “एक दिवस तरी वारी अनुभवावी” या उपक्रमात साहित्यिक, विचारवंत, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, कलावंत यांच्यासोबत सहभागी होणार आहेत. आपल्या राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हाचे अनावरण करण्यासाठी शरद पवार तब्बल 40 वर्षांनी रायगडावर गेले वयमान परत्वे त्यांना डोलीत बसून रायगड सर करावा लागला. पण पवारांना याचा राजकीय लाभ झाला. महाराष्ट्रात त्यांच्या 10 पैकी 8 जागा निवडून आल्या.
आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आषाढी वारीत पायी चालणार आहेत. त्यांच्या सोबत काँग्रसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हासदादा पवार , जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे वंशज ह. भ. प. बापूसाहेब महाराज देहूकर, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाचे ह. भ. प. भारत महाराज जाधव, मार्मिक साप्ताहिकाचे संपादक मुकेश माचकर, कवी अरुण म्हात्रे, अभिव्यक्ती चॅनलचे रविंद्र पोखरकर आदी मान्यवर सहभागी होणार आहेत, अशी माहिती शामसुंदर महाराज सोन्नर यांनी दिली.
पुरोगामी वारी
‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ हा उपक्रम गेली दहा वर्षे राबविला जात आहे. यंदाचे 11 वे वर्ष असून शामसुंदर महाराज सोन्नर यांच्या नेतृत्वाखाली शरद कदम, अविनाश पाटील, वर्षा देशपांडे, सुभाष वारे, राजाभाऊ अवसक, विशाल विमल, दत्ता पाकिरे यांच्या पुढाकाराने याचे आयोजन केले जाते. यंदा संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात 7 जुलै रोजी ही मंडळी बारामती ते सणसर हे अंतर चालणार आहेत. या उपक्रमाची माहिती देण्यासाठी शामसुंदर महाराज सोन्नर, सामाजिक कार्यकर्ते शरद कदम यांनी सोमवारी (दि. 17 जून) मुंबईतील ‘सिव्हर ओक’ या शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. त्यांना वारीत येण्याचे निमंत्रण दिले ते फवारणी स्वीकारल्याची माहिती सोन्नर यांनी दिली.
8 out of 10 happy hangovers; Pawar will do Ashadhi Vari on foot with Varakras!!
महत्वाच्या बातम्या
- भाजपच्या अनपेक्षित अपयशाच्या दुष्परिणाम; संसदेभोवती घट्ट आवळला घराणेशाहीचा फास!!
- भारतीय नौदलाच्या ताफ्यात आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या सहा पाणबुड्यांचा समावेश
- राहुल गांधी रायबरेली ठेवणार, वायनाड सोडणार; प्रियांका गांधी तिथून लढणार!!
- अर्थसंकल्प 2024: अर्थमंत्री सीतारामन अर्थसंकल्पापूर्वी उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेणार