• Download App
    अमेरिकेतील कोरोनाबाधित मृतांची संख्या पोहोचली तब्बल आठ लाखांवर । 8 lack peoples died in USA due to corona

    अमेरिकेतील कोरोनाबाधित मृतांची संख्या पोहोचली तब्बल आठ लाखांवर

    वृत्तसंस्था

    न्यूयॉर्क : अमेरिकेत कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आठ लाखांच्या वर गेली आहे. यापैकी दोन लाख जणांचा मृत्यू हा लसीकरण मोहिम सुरु झाल्यानंतर झाला आहे. जगाच्या लोकसंख्येच्या तुलनेत अमेरिकेची लोकसंख्या चार टक्के असली तरी, जगातील एकूण कोरोना मृत्यूंमध्ये अमेरिकेचा वाटा १५ टक्के आहे. अमेरिकेत ६० टक्क्यांहून अधिक प्रौढ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. 8 lack peoples died in USA due to corona



    दरम्यान ग्रीससह युरोपमधील काही देशांनी पाच ते ११ या वयोगटातील बालकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात केली आहे. ओमिक्रॉनचा वाढता संसर्ग आणि आगामी नाताळच्या सुट्यांचा काळ यामुळे लसीकरण मोहिमेला सर्व देशांनी वेग दिला आहे. इटली, हंगेरी आणि स्पेन या देशांनीही लसीकरण मोहिमेची व्याप्ती वाढविली आहे. संसर्गवाढीमुळे पालकही आपल्या मुलांच्या लसीकरणासाठी आग्रही असून ग्रीसमध्ये ३० हजार जणांनी त्यासाठी नोंदणीही केली आहे.

    8 lack peoples died in USA due to corona

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ‘G RAM G Act : जी राम जी’ मुळे राज्यांना ₹17,000 कोटींचा फायदा; उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार सर्वात मोठे लाभार्थी

    Unnao Rape Case : उन्नाव रेप केस- कुलदीप सेंगरच्या जामिनावर सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; 4 आठवड्यांनंतर पुढील सुनावणी

    Amit Shah : गृहमंत्री शहा म्हणाले- आसामसारखे पूर्ण देशातून घुसखोरांना हाकलून लावू; आसामचे स्वातंत्र्यसैनिक गोपीनाथ यांनी नेहरूंना आसाम भारतात ठेवण्यासाठी भाग पाडले