वृत्तसंस्था
नवी दिल्ली : महाराष्ट्रात झिका विषाणू संसर्गाच्या घटनांची वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राज्यांसाठी विशेष मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे. राज्यांना गरोदर मातांची झिका विषाणू संसर्गाच्या दृष्टीने तपासणी करून सतत दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.8 cases of Zika in the state, regulations issued by the Ministry of Health; Call for special care of pregnant women
झिका विषाणू संसर्ग झालेल्या गरोदर महिलांच्या गर्भाच्या वाढीवर लक्ष ठेवण्याचे आदेश असून, राज्यांनी बाधित भागातील आरोग्य सुविधा केंद्रांना झिका विषाणू संसर्गासाठी गरोदर महिलांची तपासणी करण्याचे आणि विषाणू संसर्ग झालेल्या मातांच्या गर्भाच्या वाढीवर लक्ष ठेवण्याचे निर्देशही दिले आहेत. भारतात २०१६ मध्ये गुजरात राज्यात प्रथम झिका विषाणूच्या संसर्गाची नोंद झाली होती. या वर्षी महाराष्ट्रात पुणे (६), कोल्हापूर (१) आणि संगमनेर (१) येथे झिका विषाणूच्या ८ रुग्णांची नोंद झाली आहे.
झिका विषाणूची लक्षणे
झिकाची लक्षणे सर्वसाधारणपणे डेंग्यू तापासारखी असतात. त्वचेवर पुरळ, ताप, सर्दी, घाम येणे, डोळे येणे(कंजक्टिव्हायटीस), खांदेदुखी, स्नायू वेदना आणि वेदना, डोकेदुखी, थकवा, भूक कमी लागणे.
8 cases of Zika in the state, regulations issued by the Ministry of Health; Call for special care of pregnant women
महत्वाच्या बातम्या
- नेपाळमध्ये ‘प्रचंड’ सरकार पडले, मंत्र्यांनी सामूहिक राजीनामे दिले
- भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली, अपोलो रुग्णालयात दाखल!
- Champions Trophy: भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 1 मार्चला लाहोरमध्ये खेळला जाणार?
- केंद्रीय मंत्रिमंडळ समित्यांच्या सदस्यांची नावे जाहीर, NDA मित्रपक्षांच्या मंत्र्यांनाही प्राधान्य