वृत्तसंस्था
जोगुलांबा : काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधींचे देशात नेमकी खिसेकापू किती आहेत??, याच्या संख्येविषयी कन्फ्युजन आहे. काल ते देशात 2 खिसेकापू फिरत असल्याचे म्हणत होते. आज त्यांनी खिसेकापूंची संख्या वाढवत ती संख्या 3 केली. काल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी या दोघांनाच खिसेकापू म्हटले होते. आज त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नावाची भर घालून हे तिघे देशातले 3 खिसेकापू असल्याच्या राहुल गांधींनी शिव्या दिल्या. 751.9 crore assets seized by ED in National Herald case
पण त्या पलीकडे जाऊन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी देखील असेच आकड्यातले कन्फ्युजन वाढविले आहे. नॅशनल हेराल्ड केस मध्ये सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने 751.9 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली, पण खर्गे यांनी तो आकडा वाढवून सांगत काँग्रेसची 780 कोटी रुपयांची संपत्ती जप्त झाल्याचा आरोप केला. तेलंगण मधल्या जोगुलांबा इथल्या प्रचार सभेत ते बोलत होते.
मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, हे सांगताना मला खूप दुःख होते आहे, की देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी स्थापन केलेल्या काँग्रेसच्या तीन पेपर्सची संपत्ती पंतप्रधान मोदींनी जप्त केली. नॅशनल हेराल्ड, कौमी आवाज आणि एक हिंदी पेपर नवजीवन (हे नाव मल्लिकार्जुन खर्गे विसरले) यांची 780 कोटी रुपयांची काँग्रेसची संपत्ती मोदींनी जप्त केली, असा आरोप खर्गेंनी केला. त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्येच नॅशनल हेरॉल्डची संपत्ती नेमकी किती आणि कोणाची आहे?? या विषयी कन्फ्युजन असल्याचे उघड झाले.
नॅशनल हेरॉल्ड पेपर, जो यंग इंडियन या कंपनीमार्फत चालविला जात होता, त्या कंपनीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नावावर 78 % शेअर्स होते, तर यंग इंडियन कंपनीचे होल्डिंग असोसिएटेड जर्नल लिमिटेड कंपनीकडे होते. ईडीने या दोन कंपन्यांची मिळून 751.9 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. पण काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे मात्र काँग्रेसची 780 कोटी रुपयांची संपत्ती मोदींनी जप्त केल्याची हाकाटी पिटली आहे.
काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांच्या पातळीवर तर अनागोंदी आहेच, पण अतिवरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर देखील नॅशनल हेराल्ड केस सारख्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर किती कन्फ्युजन आहे, हेच यातून उघड्यावर आले आहे.
751.9 crore assets seized by ED in National Herald case751.9 crore assets seized by ED in National Herald case
महत्वाच्या बातम्या
- डीपफेक’ व्हिडीओवर सरकारने बोलावली उच्चस्तरीय बैठक
- राहुल गांधी गाढे अभ्यासू ज्योतिषी आहेत हे समस्त भारतीयांना माहिती नव्हते, ते कालच समजले!!
- ED फुल्ल स्विंग मध्ये, नॅशनल हेराल्ड पाठोपाठ BYJU’S वर कारवाई; 9362.35 कोटी रुपयांसंदर्भात नोटीस!!
- नॅशनल हेरॉल्ड केस मध्ये ED चा गांधी परिवाराला जबरदस्त दणका; तब्बल 751.9 कोटींची मालमत्ता जप्त!!
- निवडणूक असलेल्या 5 राज्यांतून 1760 कोटी रुपयांची दारू आणि रोख जप्त; 2018च्या तुलनेत 7 पट जास्त