विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी ७५ कोटी लोक सूर्यनमस्कार घालणार आहेत. याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना पत्र लिहून ७५ व्या स्वातंत्र्यदिनी सूर्यनमस्कार घालण्याच्या मोहीमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.75 crore people will do Surynamskar on the occasion of 75th Independence Day, Union Grants Commission appeals to college students to participate
यूजीसीचे सचिव रजनीश जैन यांनी देशातील १०००हून अधिक विद्यापीठांच्या कुलगुरूंना आणि ४० हजारहून अधिक महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्र लिहून जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये होणाºया ७५ कोटी सूर्यनमस्कार कार्यक्रमात सहभागी होण्यास सांगितले आहे.
रजनीश जैन यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की या कार्यक्रमाचे उद्दिष्ट सुमारे ३० हजार महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या ३ लाख विद्यार्थ्यांद्वारे ७५ कोटी सूर्यनमस्कार घालण्याचे आहे. पत्रात १ जानेवारी २०२२ ते ७ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत चालणाऱ्या या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तसेच या उपक्रमाचा प्रचार करण्यासाठी सर्व संस्थांना सांगण्यात आले आहे.
पत्रासोबत जोडलेल्या एका पानानुसार, कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ५१ दिवसांच्या कालावधीत सुमारे २१ दिवस सूर्यनमस्कार करावे लागतील. २१ दिवस दररोज १३ सूर्यनमस्कार करावे लागतील.
याशिवाय २१ दिवसांच्या या कार्यक्रमासाठी दररोज एक मिनिटाचा व्हिडिओ बनवण्यासही सांगण्यात आले आहे. तसेच सहभागी विद्यार्थी आणि संस्थांना ७५ कोटी सूर्यनमस्कार कार्यक्रमासाठी तयार केलेल्या वेबसाइटवर नोंदणी करण्यास सांगितले आहे. सहभागी विद्यार्थी या उपक्रमात एकटे किंवा गटासह सहभागी होऊ शकतात,
असेही यात सांगण्यात आले.यूजीसीच्या या आदेशाला अनेक शिक्षणतज्ज्ञांनी विरोधही केला आहे. टेलीग्राफच्या अहवालानुसार, अलाहाबाद विद्यापीठाचे माजी कुलगुरू राजेन हर्षे म्हणाले की, यूजीसीची भूमिका शैक्षणिक मानकांचे पालन करणे आणि राखणे ही आहे, विशिष्ट प्रसंगी साजरे करण्यासाठी सूचना जारी करणे नाही. यूजीसीचा हा आदेश शैक्षणिक स्वातंत्र्य आणि उच्च शिक्षणाच्या विरोधात आहे.
75 crore people will do Surynamskar on the occasion of 75th Independence Day, Union Grants Commission appeals to college students to participate
महत्त्वाच्या बातम्या
- पीएम किसानचा १० वा हप्ता जारी : पीएम मोदींनी १०.०९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले २०,९४६ कोटी रुपये, तुमच्या खात्यात आले की नाही असे तपासा
- UP Elections : निवडणुकीपूर्वी अखिलेश यादवांची मोठी घोषणा, सत्तेत आल्यास ३०० युनिट वीज मिळणार मोफत
- मोठी बातमी : महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर, ठाकरे सरकारमधील मंत्री म्हणतात मुख्यमंत्री घेणार निर्णय!
- IMA, IIT दिल्ली आणि जामिया मिलियासह 6000 संस्थांचा FCRA परवाना कालबाह्य, परदेशी देणग्यांचा मार्ग बंद