• Download App
    राजस्थानात काँग्रेसचा माजी आमदार मेवाराम जैनचे अल्पवयीन मुलींवर भयानक अत्याचार; व्हिडिओ व्हायरल; गुन्हा दाखल, काँग्रेसची चुप्पी!! 70 year old Congress man demanding young girls for his depravity

    राजस्थानात काँग्रेसचा माजी आमदार मेवाराम जैनचे अल्पवयीन मुलींवर भयानक अत्याचार; व्हिडिओ व्हायरल; गुन्हा दाखल, काँग्रेसची चुप्पी!!

    विशेष प्रतिनिधी

    जयपूर : राजस्थानातला काँग्रेसचा माजी आमदार मेवाराम जैन हा अल्पवयीन मुलींवर बलात्कार करायचा कोणीही नकार दिला तर तो त्यांचा अमानुष छळ करायचा, तो आणि त्याचे गुंड त्यांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये काठ्या घालायचे. या भयानक प्रकारचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजस्थानात प्रचंड खळबळ उडाली आहे. 70 year old Congress man demanding young girls for his depravity

    राजस्थानातल्या आधीच्या काँग्रेसच्या अशोक गेहलोत सरकारला या सर्व प्रकारची माहिती असूनही सरकारने मेवाराम जैन आणि त्याच्या गुंडांवर कारवाई केली नाही. इतकेच नाही तर दस्तूर खुद्द राहुल गांधींना या घृणास्पद प्रकाराची माहिती कळल्यानंतर देखील मेवाराम जैन याचे तिकीट न कापता उलट त्याला विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळावे यासाठी त्यांनी स्वतः लक्ष घातले होते.

    पण आता राजस्थानात सरकार बदलले असल्याने मेवाराम जैन याला त्याच्या गुन्ह्यांची कायदेशीर शिक्षा देण्यासाठी त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

    – बारमेरचा आमदार

    70 वर्षांचा मेवाराम जैन हा काँग्रेसचा बारमेर मधला आमदार होता. त्याचे सगळे अश्लील धंदे काँग्रेस हायकमांडसकट सगळ्यांना माहिती होते, तरी देखील काँग्रेस हायकमांड त्याच्यावर मेहरबान असल्याने अशोक गेहलोत सरकारने त्याच्यावर कधी कारवाई केली नाही. मात्र त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मात्र काँग्रेसमध्ये खळबळ उडाली. मेवाराम याच्या विरोधात पीडित महिलांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली त्यांना स्टेटमेंट दिले. त्यानंतर मेवारामने धावपळ करून कोर्टातून अटकपूर्व जामीन मिळवला, पण दरम्यानच्या काळात व्हिडिओ व्हायरल झाल्याने मेवाराम आणि काँग्रेस दोन्ही अडचणीत आले.

    आता मेवाराम विरुद्ध नव्याने एफआयआर दाखल झाला आहे. पुढची कायदेशीर कारवाई वेगात करण्याचा राजस्थान सरकारचा इरादा आहे. मात्र एवढे सगळे घडूनही प्रियांका गांधी आणि “इंडिया” आघाडीतले बाकीचे नेते या विषयावर बिलकुलच बोलायला तयार नाहीत. ते सगळे मूग गिळून गप्प आहेत. याविषयी भाजपचे प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी ट्विट करून काँग्रेस हायकमांडला प्रश्न विचारले आहेत.

    70 year old Congress man demanding young girls for his depravity

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    IPL 2025 : आयपीएल २०२५चे नवीन वेळापत्रक जाहीर, १७ मे पासून सामना सुरू होणार

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानात पुन्हा ड्रोन दिसले; होशियारपूरमध्ये 5-7 स्फोट, ब्लॅकआऊट

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!