• Download App
    सुरतेत एकाच कुटुंबाची 7 जणांची आत्महत्या, वडिलांनी सर्वांना विष पाजून स्वत: घेतला गळफास; मृतांत 3 मुले|7 suicides of one family in Surat, father poisoned all and hanged himself; 3 children died

    सुरतेत एकाच कुटुंबाची 7 जणांची आत्महत्या, वडिलांनी सर्वांना विष पाजून स्वत: घेतला गळफास; मृतांत 3 मुले

    वृत्तसंस्था

    सुरत : गुजरातमधील पालनपूर पाटियाजवळील नूतन रो हाऊससमोर एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सिद्धेश्वर अपार्टमेंटमध्ये एकाच कुटुंबातील सात जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.7 suicides of one family in Surat, father poisoned all and hanged himself; 3 children died

    पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. अधिक तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. वडिलांनी कुटुंबियांना औषध देऊन गळफास घेतला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.



    मिळालेल्या माहितीनुसार, या कुटुंबातील सात सदस्यांमध्ये पती-पत्नी, आई-वडील, दोन मुले आणि एक मुलगी यांचा समावेश आहे. या घटनेचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

    पोलिसांनी प्रथम मृतदेह रुग्णालयात हलवण्याची कारवाई केली आहे. यासोबतच आजूबाजूचे लोक आणि कुटुंबीयांचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र, आर्थिक विवंचनेमुळे कुटुंबाने आत्महत्या केली असावी, असा अंदाज आता वर्तवला जात आहे.

    7 suicides of one family in Surat, father poisoned all and hanged himself; 3 children died

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य