विशेष प्रतिनिधी
जयपूर : मध्य प्रदेश, राजस्थान सह 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका घोषित होताच तिकीट वाटपाला वेग आला असून मध्य प्रदेशात ज्याप्रमाणे भाजपने 3 केंद्रीय मंत्री, 7 खासदार यांना विधानसभेची तिकिटे देऊन निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे, तोच प्रयोग भाजपने राजस्थानात केला असून 41 उमेदवारांच्या पहिल्या यादीत भाजपने 7 खासदारांना विधानसभा निवडणुकीच्या रणमैदानात उतरविले आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मध्य प्रदेश आणि राजस्थान अनेक भाकऱ्या फिरवल्या आहेत.7 MPs in first list of 41 BJP candidates in rajasthan
राजस्थानातील 41 उमेदवारांच्या यादीत भाजपने खासदार किरोडीलाल मीणा यांना सवाई माधोपुर मधून विधानसभा निवडणुकीचे तिकीट दिले असून खासदार भगीरथ चौधरी, खासदार बाबा बालकनाथ, खासदार नरेंद्र कुमार, खासदार देवीसिंह पटेल आणि माजी केंद्रीय मंत्री रायफल शूटिंग मधले ऑलिंपिक पदक विजेते खासदार राज्यवर्धन सिंह राठोड यांना जयपूर मधून विधानसभेच्या मैदानात उतरविले आहे, तसेच खासदार दिया कुमारी यांनाही विधानसभा निवडणुकीचे तिकीट दिले आहे.
त्यामुळे मध्य प्रदेश बरोबर राजस्थानातही भाजप मधल्या अंतर्गत फेरबदलाचा मोठा परिणाम दिसतो आहे. पहिल्या यादीतून विद्यमान आमदार नरपतसिंह राजवी आणि राजपाल सिंह शेखावत यांची तिकिटे कटली आहेत हे दोन्ही नेते माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे निकटवर्ती मानण्यात येतात.
भाजपच्या राजस्थानातल्या पहिल्या यादीचे वैशिष्ट्य असे, की उमेदवारी जाहीर केलेल्या 41 जागांपैकी 19 जागांवर भाजप कधीही जिंकलेला नाही, त्याचबरोबर अन्य काही जागांवर गेल्या निवडणुकीमध्ये भाजप पराभूत झाला होता.
राजस्थान बरोबरच मध्य प्रदेशातील चौथी यादी चौथी 57 उमेदवारांची यादी आणि छत्तीसगड मधली पहिली 63 उमेदवारांची यादी भाजपने जाहीर केली आहे.
काँग्रेसच्या याद्या अद्याप गुलदस्त्यात
काँग्रेसची मात्र अद्याप एकही यादी पुढे आलेली नसून केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर करताच काँग्रेस कार्यकारणीची नवी दिल्लीच्या मुख्यालयात बैठक झाली आणि त्यामध्ये काँग्रेस शासित राज्यांमध्ये जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय झाला. त्यापलीकडे पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीबाबत आणि तिथल्या उमेदवारीबाबत काही चर्चा झाल्याची माहिती राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत दिली नाही. पाचही राज्ये आम्ही जिंकू एवढेच ते म्हणाले.
7 MPs in first list of 41 BJP candidates in rajasthan
महत्वाच्या बातम्या
- द फोकस एक्सप्लेनर : इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या वादाचे मूळ काय? कसे मजबूत झाले ज्यू? वाचा सविस्तर
- नैनितालमध्ये भीषण अपघात, ३२ प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळी , १४ जण बेपत्ता
- अडातच नाही, तर पोहऱ्यात कुठून??; कराडातच नाही, तर बारामतीत कुठून??
- ५०० वर्षांनंतर रामजन्मभूमी परत घेतली, तर ‘सिंध’ का नाही? मुख्यमंत्री योगी यांचे मोठे विधान!