• Download App
    दिल्लीत केजरीवालांनी लॉकडाऊन जाहीर केले; खान मार्केटमध्ये दारू दुकानांवर गर्दी उसळली 6-day lockdown in Delhi to remain in effect from 10 pm tonight to 5 am next Monday

    दिल्लीत केजरीवालांनी लॉकडाऊन जाहीर केले; खान मार्केटमध्ये दारू दुकानांवर गर्दी उसळली

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली – दिल्लीत कोरोनाच्या फैलावाला अटकाव करण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ६ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले… खान मार्केटमध्ये सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडवत शौकीनांनी दारू दुकानांवर गर्दी केली. 6-day lockdown in Delhi to remain in effect from 10 pm tonight to 5 am next Monday

    दिल्लीत रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडू लागला आहे. तसेच रुग्णांची संख्या दिवासागणिक वाढतच चालली आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी दिल्ली सरकारने ६ दिवसांचा लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे.

    आज सोमवारी रात्रीपासून (१९ एप्रिल) ते २६ एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू असतील, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील जनतेला संबोधित करताना सांगितले. केजरीवालांचे भाषण संपताच खान मार्केटमध्ये दारूच्या दुकानांपुढे शौकीनांचा रांगा लागल्याचे दृश्य दिसले. यात सोशल डिस्टंसिंगचाही फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले.

    जनतेला संबोधित करताना केजरीवाल म्हणाले, की आम्ही चाचण्या कमी केल्या नाहीत तर वाढवल्या. दिल्लीत रोज १ लाख चाचण्या होत आहेत. आम्ही मृत्यूचे आकडेही लपवले नाहीत. जी परिस्थिती आहे ती नेहमीच जनतेसमोर ठेवली. दिल्लीत गेल्या २४ तासात २३ हजार ५०० रुग्ण आढळले आहेत. दिवसाला २५ हजार रुग्ण पॉझिटिव्ह होत असतील तर आरोग्य व्यवस्था ढासळेल. दिल्लीत १०० पेक्षी कमी आयसीयू बेड आहेत.

    ऑक्सिजनसाठी केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. एका खासगी रुग्णालयाने तर रात्री तीन वाजता ऑक्सिजन संपला होता असे सांगितले. मात्र वेळीच उपलब्ध झाल्याने खूप मोठी दुर्घटना टळली. औषधांचा तुटवडा जाणवत आहे. या सर्व गोष्टी पाहता दिल्लीमध्ये परिस्थिती गंभीर आहे. नागरिकांनी कठोर निर्बंध पाळून सहकार्य करण्याचे आवाहनही केजरीवाल यांनी केले.

    6-day lockdown in Delhi to remain in effect from 10 pm tonight to 5 am next Monday

    Related posts

    Bilawal Bhutto : दहशतवादाला प्रोत्साहनाची बिलावल भुट्टोंची कबुली; म्हणाले- पाकिस्तानचा इतिहास कोणापासून लपलेला नाही

    Abu Azmi : फिलिपाइन्सशी आमचा धर्म जुळला, त्यांचे झेंडे जाळायला विरोध; आमदार अबू आझमींचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

    माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्काराच्या निमित्ताने अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या पक्षांमध्ये काड्या, पण सत्कार स्वीकारायला येणार कोण??

    Icon News Hub