• Download App
    Santosh Deshmukh

    Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्याप्रकरणी 6 आरोपींना न्यायालयीन कोठडी; कराडच्या जामिनावर उद्या सुनावणी‎

    Santosh Deshmukh

    Santosh Deshmukh

    विशेष प्रतिनिधी

    बीड : Santosh Deshmukh  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या ‎प्रकरणात सध्या पोलिस कोठडीत असलेल्या सुदर्शन ‎घुले, जयराम चाटे, महेश केदार, सुधीर सांगळे, प्रतीक ‎घुले व सिद्धार्थ सोनवणे या 6 आरोपींना शनिवारी ‎बीडच्या विशेष मकोका न्यायालयाच्या न्या. सुरेखा ‎पाटील यांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.Santosh Deshmukh

    ‎तपासात सध्या पोलिस कोठडीची आवश्यकता नसल्याने ‎एसआयटीच्या अपर पोलिस अधीक्षक किरण पाटील ‎यांनी गरजेनुसार पुन्हा पोलिस कोठडी मागण्याचा हक्क ‎अबाधित ठेवून आरोपींना न्यायालयीन कोठडी द्यावी, ‎अशी विनंती केली होती. दुसरीकडे, केज न्यायालयात ‎वाल्मीक कराडवरील खंडणीच्या गुन्ह्यात मांडलेल्या ‎जामिनावर सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून ‎सोमवारी (२० जानेवारी) ही सुनावणी होणार आहे. ‎



    मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या ‎हत्येला ४० दिवस झाले आहेत. या प्रकरणात सुरुवातीला ‎‎सुदर्शन घुले, जयराम चाटे, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, ‎‎महेश केदार, कृष्णा आंधळे आणि विष्णू चाटे या सात ‎‎जणांविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवला गेला होता. तपासात ‎‎सिद्धार्थ सोनवणे यानेही मदत केल्याचे समोर आल्याने ‎‎त्यालाही आरोपी केले गेले होते. तर त्यानंतर मकोका लागू ‎‎केल्यानंतर तपासात पोलिसांनी वाल्मीक कराडलाही या ‎प्रकरणात आरोपी केले आहे. त्यामुळे या प्रकरणातील ‎आरोपींची संख्या ९ झाली आहे. सध्या कृष्णा आंधळे ‎वगळता ८ जण अटकेत आहेत. ‎

    शनिवारी व्हीसीद्वारे बीडच्या विशेष‎मकोका न्यायालयाने न्यायालयीन‎कोठडी सुनावल्यामुळे सहाही जण‎जामीन अर्ज करण्यासाठी पात्र झाले‎आहेत. मात्र खुनासह मकोका‎लागल्यामुळे त्यांच्या जामिनाचा‎मार्ग कठीण आहे. मकोकामुळे‎जामीन मिळणार नाही. दरम्यान,‎वाल्मीक कराडला बीड शहर‎ठाण्यात ठेवले आहे.‎

    6 accused in Santosh Deshmukh murder case remanded in judicial custody; Karad’s bail hearing tomorrow

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Tani community : तानी समुदायाच्या लोकांची मागणी, तानीलँडची निर्मिती करा; पोलिसांनी युनायटेड तानी आर्मीची टोळी पकडली

    Mumbai soldier : पाकविरोधात लढताना मुंबईचा जवान शहीद; मुरली नाईक यांना उरीमध्ये लढताना वीरमरण

    Neeraj Chopra : आयपीएल नंतर आता ‘ही’ क्रीडा स्पर्धा देखील भारतात झाली स्थगित