• Download App
    गुजरातमध्ये आम आदमी पार्टीला मोठा धक्का, सुरतमधील 'आप'चे सहा नगरसेवक भाजपमध्ये दाखल!6 AAP corporators from Surat joined BJP in the presence of state Home Minister Harsh Sanghavi

    गुजरातमध्ये आम आदमी पार्टीला मोठा धक्का, सुरतमधील ‘आप’चे सहा नगरसेवक भाजपमध्ये दाखल!

    विशेष म्हणजे याआधीच आम आदमी पार्टीच्या चार नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे.

    विशेष प्रतिनिधी

    सुरत : गुजरातमध्ये आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी आम आदमी पक्षाच्या (आप) एकूण सहा नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 6 AAP corporators from Surat joined BJP in the presence of state Home Minister Harsh Sanghavi

    स्वाती कायडा, निराली पटेल, धर्मेंद्र वावलिया, अशोक धामी, किरण खोखानी आणि घनश्याम मकवाना यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे याआधी आम आदमी पार्टीचे चार नगरसेवक रिटा खैनी, ज्योती लठिया, भावना सोलंकी आणि विपुल मोवालिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

    २०२१च्या गुजरात सार्वत्रिक निवडणुकीत आम आदमी पार्टीने सुरत महानगरपालिकेत (SMC) २७ जागा जिंकल्या होत्या. सुरत महापालिकेमध्ये एकूण १२० जागा आहेत. त्यापैकी ९३ जागा भाजपने जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. आता आम आदमी पक्षाचे एकूण १० नगरसेवक भाजपात सामील झाल्याने सुरत महापालिकेतील भाजपाची एकूण सदस्यांची संख्या १०३ झाली आहे.

    6 AAP corporators from Surat joined BJP in the presence of state Home Minister Harsh Sanghavi

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    Judge Cash case : जज कॅश केस, सरन्यायाधीशांनी PM-राष्ट्रपतींना अहवाल सोपवला; तीन न्यायाधीशांच्या समितीकडून चौकशी

    अमेरिका + पाकिस्तान यांनीच ceasefire शब्द वापरला; भारताने फक्त firing आणि military action थांबविल्याचे सांगितले; याचा नेमका अर्थ काय??